शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे वारसदार व्हावे'; विजय वडेट्टीवार यांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:20 IST

Maharashtra Politics : काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

Maharashtra Politics ( Marathi News ) : 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार व्हावे, असं विधान करत काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सीएम फडणवीस यांचे कौतुक केले. चंद्रपूरातील एका कार्यक्रमात काँग्रेस आमदार वडेट्टीवार यांनी हे विधान केले.  यावेळी त्यांनी भविष्यात फडणवीस यांनी देशाचे नेतृत्व करावे, असं विधानही केले. चंद्रपूर येथे लोकनेते कर्मवीर मारोतराव कन्नमवारजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्यामध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले. 

CID कोठडीत वाल्मीक कराडची झोप उडाली; डोळे लालबुंद अन् प्रचंड तणाव, डॉक्टरांकडून तपासणी!

यावेळी कार्यक्रमात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, एका माजी मुख्यमंत्र्यांच्या १२५ व्या जयंतीला जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झाले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्‍यांच्या कार्यक्रमासाठी ते आले आहेत, हा मोठेपणा असतो. त्यावेळी आम्ही  मारोतराव कन्नमवारजी यांच्याकडे यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून बघायचो, आता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार व्हावे, असं विधान करत त्यांनी सीएम फडणवीस यांचे कौतुक केले. 

"पाच वर्षाच्या जिल्ह्याच्या विकासाला किशोर यांनी जो प्रस्ताव मांडला आहे. त्या प्रस्तावाला मी अनुमोदन देत आहे. मारोतराव कन्नमवारजी यांनी मुख्यमंत्री काळात मोठं काम केलं. त्यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची सुरुवात त्यांच्याकडून झाली. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री तेच झाले होते. त्यांनी विकासाची पायाभरणी केली, या विकासाचे कळस म्हणून देवेंद्रजी काम करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे, असं कौतुकही विजय वडेट्टीवार यांनी केले. 

आपण भविष्यात देशाचे नेतृत्व कराल

आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, जे काम मारोतराव कन्नमवारजी यांनी केले, त्या कामाला यांनी पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक म्हणून स्विकारले पाहिजेत. आपण भविष्यात देशाचे नेतृत्व कराल, असं मोठं विधानही वडेट्टीवार यांनी केले.  मारोतराव कन्नमवारजी यांनी खूप कष्टातून सुरुवात केली आहे. पेपर वाटण्यापासून सुरुवात केली. ते पुढे मुख्यमंत्रि‍पदापर्यंत पोहोचले होते, असंही वडेट्टीवार म्हणाले.     

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसBJPभाजपा