लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा मला सामना करावा लागला. अनेकदा माझ्यावर अन्याया झाला. अन्यायाविरोधात संघर्ष करा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द मला आठवतात. त्यातून मला संघर्ष करण्याची हिंमत मिळते. चंद्रपूरकरांनीही अन्याय कधीच सहन करायचा नाही, असे आवाहन चंद्रपूरचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी केले.आज गांधी चौक येथे आयोजित विशाल जन आर्शिवाद सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी डॉ. शफीक अहमद, राजेंद्र वैद्य, दीपक दापके, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सुर्यकांत खनके, सुधाकर कातकर, शशिकांत देशकर, विशाल निंबाळकर, अमजद अली, संजय वैद्य, बलराम डोडानी, लक्ष्मण ढोबे, चंद्रमा यादव, दयालाल कन्नाके, अन्वर अली, अजय जयस्वाल, गणपत सत्रे, विवेक आंबेकर, प्रा. श्याम हेडाऊ, संगिता भोयर, अशोक मत्ते आदी उपस्थित होते. यावेळी गांधी चौकात हजारोच्या संख्येत जनसमुदाय स्वयंस्फूर्तीने उपस्थित झाला होता.सेवाव्रतीला संविधानिक सेवेचा अधिकार द्या-महाकुळकरराजकारणात येऊनही किशोर जोरगेवार हे समाजसेवेचे व्रत जोपासत आहेत. त्यांना निवडून देण्याची हीच खरी वेळ आहे. त्यांच्या समाजसेवेला संविधानाचे बळ देण्याचे आवाहन सुरेश महाकुळकर यांनी केले.
Maharashtra Election 2019 ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST