Maharashtra Election 2019 ; चंद्रपूर विधानसभा मतदानाची वाढणार टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:39+5:30

सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा चंद्रपूर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांना शहरातील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आतापर्यंत ३० पेक्षा अधिक व्यावसायिकांनी मतदान करणाºया नागरिकांना खरेदीवर १० टक्के सूट जाहीर केली आहे.

Maharashtra Election 2019 ; Chandrapur Assembly polling percentage to rise | Maharashtra Election 2019 ; चंद्रपूर विधानसभा मतदानाची वाढणार टक्केवारी

Maharashtra Election 2019 ; चंद्रपूर विधानसभा मतदानाची वाढणार टक्केवारी

Next
ठळक मुद्देमतदार जागृती मोहीम : मतदान करणाऱ्यांना मिळणार व्यावसायिकांकडून सवलती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्र्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता शहरातील व्यावसायिकांनी मतदार जागृतीमध्ये सहभागी होऊन विविध सवलती जाहीर केल्या. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी व्यक्त केला. मंगळवारी शहरातील विविध रेस्टॉरंटला भेट देऊन संचालकांशी चर्चा केली.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापेक्षा चंद्रपूर मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम सुरू आहेत. या उपक्रमांना शहरातील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आतापर्यंत ३० पेक्षा अधिक व्यावसायिकांनी मतदान करणाऱ्या नागरिकांना खरेदीवर १० टक्के सूट जाहीर केली आहे. शहरातील एनडी हॉटेलने मतदान करणाऱ्या ग्राहकांना सवलत जाहीर केली आहे. रसराज बिकानेरवाला आणि इतर २३ रेस्टॉरंट मालकांनी २१ ऑक्टोबर रोजी मतदान करून येणाऱ्या मतदारांना त्यांच्या एकूण खरेदीवर १० टक्के सूट जाहीर केली होती. व्यावसायिकांच्या माध्यमातून स्टिकर, फलक लावण्यासोबतच मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केल्या जात आहे. देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी डॉ. खेमनार शहरातील अन्य व्यावसायिक प्रतिष्ठानांही भेट देणार आहेत.

ही आहेत प्रतिष्ठाने
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी मतदार केल्यास २१ ते २३ ऑक्टोंबर २०१९ दरम्यान खाद्य पदार्थांच्या खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. शहरातील रसराज रेस्टॉरंट, मेहर रेस्टॉरंट, त्रिमूर्ती रेस्टॉरंट, बाबा रेस्टॉरंट, बिकानेर भुजिया भंडार, श्री कृपा रेस्टॉरंट गोल बाजार, न्यू त्रिमूर्ती रेस्टॉरंट, आनंद स्वीट्स तुकुम, मधुर स्वीट्स बंगाली कॅम्प, माया उपहारगृह गोल बाजार, बिकानेर भुजीयावाला, अन्नपूर्णा स्वीट मार्ट बागला चौक, बिकानेर भुजियावला गोकुलगल्ली, वैष्णवी स्वीट मार्ट गंजवार्ड, लिचिप रेस्टॉरंट, लालजी बीकानेर, महाकाली स्वीट तूकुम, नूतन रेस्टॉरंट, बालाजी बिकानेर, महाकाली वार्ड, राधे स्वीट्स तुकूम, कालिका स्वीट मार्ट, अंकल धाबा या रेस्टॉरंटमध्ये ही सवलत मिळणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Chandrapur Assembly polling percentage to rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.