शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

किशोर जोरगेवारांचा शरद पवार पक्षातला प्रवेश रखडला; धानोरकांच्या विरोधानंतर प्रश्न दिल्ली दरबारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:23 IST

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाला विरोध केला आहे.

Kishor Jorgewar :  चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जोरगेवार यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे चंद्रपूर येथे महायुतीला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक किशोर जोरगेवार हे २३ तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार होते. मात्र आता आमदार किशोर जोरगेवार यांचा शरद पवारांच्या पक्षातील पक्षप्रवेश रखडला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधामुळे किशोर जोरगेवार यांचा पक्ष प्रवेश झालेला नाही. 

चंद्रपूर विधानसभेत किशोर जोरगेवार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी जोरगेवार विजयी झाले होते. शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवतील असा अंदाज असताना अचानक त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र यावरुन वाद झाल्याने महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जोरगेवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पक्ष प्रवेश निश्चित केला होता. पण लोकसभेत भाजपचा प्रचार करणाऱ्या जोरगेवारांसाठी मते कशी मागायची असा सवाल करत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांना विरोध केला आणि पक्षश्रेष्ठींकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर आता जोरगेवार यांचा शरद पवार गटातील प्रवेश थांबवण्यात आला आहे.

प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधामुळे आपला पक्षप्रवेश थांबला असल्याचे जोरगेवार यांनी म्हटलं आहे. "मला महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून २० दिवसांपूर्वी आमच्या पक्षाकडून तिकीट घेतले तर निवडून याल असे सांगितले होते. मी त्यांना हो म्हटलं होतं. महाविकास आघाडीचा उमेदवार होण्याची माझी इच्छा होती.  पण माझा पक्ष प्रवेश थांबवण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे माझा पक्ष प्रवेश थांबला आहे," असं किशोर जोरगेवार म्हणाले.

"खासदार प्रतिभा धानोरकर यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ मी पाहिला आहे. व्हिडीओमध्ये त्या स्पष्टपणे विरोध करताना दिसत आहेत. जोरगेवार यांनी पाच वर्षात कुठलेही काम केलं नसल्यामुळे त्यांना तिकीट देऊ नये असं त्या म्हणत आहेत. शरद पवार गटाकडून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या विरोधामुळे हा तिढा दिल्ली दरबारी पाठवण्यात आला असून त्याचा निकाल कळवण्यात येईल असे शरद पवार गटाने सांगितले," असेही किशोर जोरगेवार म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरSharad Pawarशरद पवार