शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

विविध मागण्यांसाठी मादगी समाज संघटनेचा मोर्चा

By admin | Updated: July 1, 2014 01:22 IST

महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या संख्येने

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.गांधी चौकातून निघालेल्या या मोर्चामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय होती. यावेळी अनुसूचित जातीच्या ५९ जातीमध्ये अनु. क्र. ३५ वर मादगी या जातीची नोंद आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम ३४१ नुसार १३ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. परंतु सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता मादगी व त्यांच्या समकक्ष अतिमागासलेल्या जातीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीची वर्गवारी पाडून वेगळ्या आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अण्णाभाऊ आर्थिक विकास महामंडळामध्ये २०१३ ला मादगी समाजातील जनतेनी कर्जाकरिता दिलेल्या कर्ज प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी, अनु.जाती मधील मादगी समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांवर सेवाज्येष्ठता व शैक्षणिक पात्रतेनुसार बढती देण्याची तरतूद करावी, अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ संचालक मंडळावर मादगी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना घेण्यात यावे, १ ते १० वीपर्यंत शिष्यवृत्ती मिळणाऱ्या योजनेतील जाचक अटी रद्द कराव्या, आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयात सभेमध्ये रुपांतर झाले. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण रामटेके, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष नारायण मुनघाटे, प्रदेश जिल्हा महासचिव राजेश पोलेवार, कोषाध्यक्ष रामाजी शंकावार, टी.एन. पोलेवार, मंदीप गोरडवार यांच्यासह अ‍ॅड. मोरे, ज्ञानेश्वर वाघमारे, विश्वनाथ कोरेवार, संजय बळकंटीवार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)