शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे मिळाली हरवलेली बैलजोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 15:22 IST

Chandrapur : येसगाव येथील शेतकऱ्यांची प्रामाणिकता: चार दिवस केले पालन पोषण

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील येसगाव शिवारातील नागेंद्र वाढई यांच्या शेतातील हिरवा भाजीपाला खाण्यासाठी एक अनोळखी जोडी शेतात आली. तिला हाकलून लावले तरी परत गेलीच नाही. एक नाही, दोन नाही तीन दिवस होऊनही ती परत जात नव्हती. वाढई हे त्या बैलजोडीची आपल्या बैलजोडीप्रमाणेच संगोपन करत होते. त्यांनी याबाबत पोलिस पाटलांना सांगितले. त्यांनी लगेच सोशल मीडियावर त्या बैलजोडीचा फोटो टाकला. अन् दुसऱ्याच दिवशी ऋषी रघुनाथ ढोले त्या बैलजोडीचे मालक घरी आले अन् पंचासमक्ष ती बैलजोडी घेऊन गेले. सोशल मीडियाच्या किमयाने बैलजोडी मिळाल्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगत आहे.

वाढई यांच्या शेतात हिरवा भाजीपाल्याची लागवड केली आहे. भाजीपाल्यावर ताव मारण्याकरिता गावातील गुरेढोरे सातत्याने जातात. यात सुमारे ६० हजारांच्या जवळपास असणारी एक अनोळखी बैल जोडी चार दिवसांपासून सतत होत होती. नागेंद्र वाढई हे इतर बैलांना जसे हाकलायचे तसेच त्या बैलजोडीलासुद्धा हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र ती जागची हालतच नाही. त्यामुळे त्यांनी त्या बैलजोडीला दानापाणी दिला.

सतत तीन दिवस होऊन कुणी बैलजोडी नेण्यास आला नाही. अन् ती बैलजोडी शेतातून हलण्यास तयार नव्हती. त्याने याबाबतची माहिती येसगाव येथील पोलिस पाटील राजू कोसरे यांना दिली. त्यानी बैलजोडीचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. दुसऱ्या दिवशी बैलजोडीचे खरे मालक ऋषी ढोले आले आणि ती बैलजोडी घेऊन गेले.

पंचासमक्ष मूळ मालकांच्या स्वाधीन केली जोडीपोलिस पाटलांनी सोशल मीडियावर त्या बैलजोडीचा फोटो टाकून ज्याची जोडी असेल त्यांनी गावातील प्रतिष्ठित पंच सोबत येऊन आपली मालकी सिद्ध करून बैलजोडी घेऊन जाण्याचे आवाहन केले. सोशल मीडियावर बातमी वाऱ्यासारखी पसरात गाडीसुचि ऋषी ढोले आपली बैल जोडी चार दिवसांपासून हरवल्याचे सांगत गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांसह मालकी हक्क सांगितला. त्यामुळे गावातील पंचासमक्ष सदर बैल जोडी मूळ मालकास वापस देण्यात आली. तालुक्यात शेळ्ळ्या-बकऱ्या चोरीला जात असल्याच्या घटना सुरू असतानाच एका गरीब शेतकऱ्यांनी आपली प्रामाणिकता दाखवत दुसऱ्याही शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत विनाअट बैलजोडी परत केल्याने येसगाय येथील नागेद्र वाढई यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपAgriculture Sectorशेती क्षेत्र