शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

हवालदिल बेरोजगारांच्या नोकर भरतीकडे नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. अनेकांनी तर मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर येथे विशेष शिकवणी वर्ग लावले असून भुक तहान विसरुन दिवसरात्र अभ्यास करीत आहेत. मात्र कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आले. संपूर्ण उद्योगधंदे, छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. परिणामी सरकारला मिळणारा महसुल बंद झाला. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कर्ज घ्यावे लागले.

ठळक मुद्देनोकर भरती बंदीमुळे युवकांमध्ये नैराश्य : प्रारंभीचे काही महिने अल्पवेतनात काम करायला युवक तयार

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याची आर्थिक स्थिती सक्षम होईपर्यंत नोकरभरती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाचा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांकडून कडाळून विरोध होत आहे. मागील अनेक वर्षांपासून भूक-तहान विसरुन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया युवकांमध्ये नैराश्य पसरले आहे. अर्थव्यवस्था सुरळीत होईपर्यंत वेतन कमी द्या, पण नोकरभरती राबवा, अशी आर्त मागणी आता हवालदिल बेरोजगार करताना दिसत आहे.शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. अनेकांनी तर मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर येथे विशेष शिकवणी वर्ग लावले असून भुक तहान विसरुन दिवसरात्र अभ्यास करीत आहेत. मात्र कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आले. संपूर्ण उद्योगधंदे, छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले. परिणामी सरकारला मिळणारा महसुल बंद झाला. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कर्ज घ्यावे लागले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा असलेल्या विभागाशिवाय इतर सर्व विभागांमधील २०२०-२१ मधील पदभरती राज्यसरकारने रद्द केली. त्यामुळे मोठ्या आशेने राज्य किंवा केंद्रीय सेवेत अधिकारी बनण्याचे स्वप्न भंग झाले. आधीच बेरोजगारीचा डोंगर आहे. त्यातच पुन्हा नोकरभरती बंद केल्याने बेरोजगारांनी करायचे काय, असा प्रश्न उपस्थित होत असून देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होईपर्यंत आम्ही अल्पवेतनात काम करायला तयार आहोत. त्यामुळे सरकारने नोकरभरती घ्यावी, अशी प्रतिक्रीया अनेक बेरोजगार युवकांकडून होत आहे.वयोमर्यादेचा फटका बसणारसर्वसाधारण नोकरीसाठी ३३ वर्षापर्यंत अट होती. राखीव जमातीसाठी पाच वर्ष शिथीलता देण्यात आली. मात्र त्यानंतर यामध्ये वाढ करुन ३८ वर्ष करण्यात आले. त्यामुळे अनेकांना संधी चालून आली होती. ज्याची वयोमार्यादा ओलांडण्यासाठी एक ते दोन वर्ष असणारे युवकसुद्धा तयारीला लागले. मात्र आता नोकरभरती बंद करण्यात आल्याने त्यांना फटका बसणार आहे.व्यवसायासाठी कर्जही मिळेनादेशात बेरोजगारीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातही नोकरभरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला. व्यवसाय करतो म्हटला, तर शासनाकडून तारण ठेवल्याशिवाय कर्ज मिळत नाही. मात्र करायचे काय, असा प्रश्न बेरोजगारांना पडला आहे.राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली मात्र अनेक परीक्षेबद्दल संभ्रमकोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्यापूर्वीच राज्यसेवा भरतीची जाहिरात निघाली होती. यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले. परीक्षेसंदर्भात वेळापत्रकही तयार झाले होते. मात्र कोरोना संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, महाअभियात्रिकीसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. मात्र त्याव्यतीरिक्त रेल्वे विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी विभागाच्या परीक्षासंदर्भात कोणतीही सुचना दिली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारने मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण पुढे करुन नोकरभरती बंद केली. मात्र याही स्थितीत आम्ही सरकारला सहकार्य करण्याच्या अनुषंगाने अर्थव्यवस्था सुरळीत होतपर्यनत मोफत काम करण्यासाठी तयार आहोत. मात्र शासनाने नोकरभरती बंद न करु नये.-मंगेश सहारे, चंद्रपूरतत्कालीन सरकारने ७२ हजार पदांची मेगा भरती करू असे सांगितले. मात्र, बेरोजगार युवकांना गाजर दाखविले. महाविकास आघाडी सरकारने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला तेवढ्यात कोरोना महामारीने आगमन झाले. त्यामुळे सरकारने कोणतीही नवीन भरती न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील पाच-सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे नवीन भरती घेण्यात यावी, जोपर्यंत अर्थव्यवस्था रोडवर येत नाही तोपर्यंत कमी पगार दिला तरी चालेल.-श्रीकांत चोथले, चंद्रपूरकोरोना संसर्गापूर्वी अनेक विभागात भरती संदर्भात जाहिरात निघाली. त्यामध्ये युवकांनी ५०० ते हजार रुपये चालण भरुन अर्ज भरले. कोरोनाची स्थितीच निवळताच किमान या परीक्षाची पुढील प्रक्रीया सुरु करावी.-चेतन खोब्रागडे, चंद्रपूरशासकीय नोकरीच्या आशेने घर सोडून अभ्यासाठी जिल्ह्याचे ठिकाण गाठले. मात्र नोकरभरती बंद करण्याचा निर्णय शासनाने घेऊन सर्व इच्छा-आकांक्षावर पाणी फेरले.-पुष्पकांत डोंगरे, सावलीअर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी बरेच उपाय आहेत. त्याची अमंलबजावणी करावी. आम्ही स्पर्धात्मक परीक्षेला समोर जाण्यास तयार आहोत. नोकरभरती बंद करु नये, ती सुरुच ठेवावी, हक्काचे वेतन द्यावे.- श्रीकांत साव, चंद्रपूर 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारी