चंद्रपूर : मराठीचा सन्मान असलेला आणि ज्याची वर्षभरापासून प्रतीक्षा असते अशा ‘लोकमत दीपोत्सव’ अंकाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा कार्यालयात (धनराज प्लाझा चंद्रपूर) सायंकाळी ५ वाजता हा समारंभ होईल. जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश कोरे, आनंद नागरी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख, ओरियंटल इन्शोरन्सचे क्षेत्रीय व्यवस्थापक विजय सावतकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजय हिरेमठ, बजाज कॅपिटलचे शाखा व्यवस्थापक मनिष यादव, चार्टंट अकाऊंटंट हर्षवर्धन सिंघवी, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा आदी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपुरातील स्टॉलवर दीपोत्सव उपलब्ध४वाचकांची मागणी आणि प्रतिसाद लक्षात घेता ५ नोव्हेंबरपासून दीपोत्सवचे अंक चंद्रपुरातील सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध करण्यात आले आहेत. या अंकाचे मुल्य २०० रूपये ठेवण्यात आले आहे. अंक प्राप्त करण्यासाठी चंद्रपूर शहरातील लोकमतचे प्रमुख विक्रेते रमण बोथरा (९९२२९३०१५३) आणि जीतेंद्र चोरडिया (९८२३१६८९६०) तसेच लोकमत जिल्हा कार्यालय, धनराज प्लाझा, लोकमान्य कन्या शाळेजवळ, मेन रोड चंद्रपूर (०७१७२-२५२१०१) या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
लोकमत ‘दीपोत्सव’चे आज लोकार्पण
By admin | Updated: November 5, 2015 01:22 IST