शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; पहिल्यांदाच महाराष्ट्राची मोठी अधोगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 21:20 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. देशात ५० हजार तर महाराष्ट्रात १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महच्या झाल्या. महाराष्ट्राची एवढी अधोगती यापूर्वी कधीही झाली नाही, असा घाणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत केला.

ठळक मुद्देअशोक चव्हाण भाजपवर घाणाघात काँग्रेसच्या प्रचार सभेला उसळला जनसमुदाय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भाजपच्या पाच वर्षांच्या काळात बेरोजगारी वाढली. १५ लाखांचे आश्वासनही पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. देशात ५० हजार तर महाराष्ट्रात १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या आत्महच्या झाल्या. महाराष्ट्राची एवढी अधोगती यापूर्वी कधीही झाली नाही, असा घाणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत केला. तीन राज्यात भाजपला जनतेनी पायउतार केले. आता वेळ महाराष्ट्राची आहे. राहुलजींना पंतप्रधान पहायचे आहे. काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा विजयी करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रचारार्थ येथील चांदा क्लब ग्राऊंडवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा दुपारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. मंचावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, उमेदवार सुरेश धानोरकर, गडचिरोली मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार, राकाँचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, डॉ. रजनी हजारे व अन्य काँग्रेस-राकाँ पदाधिकारी उपस्थित होते. या सभेसाठी तळपत्या उन्हात चंद्रपूर व गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या उपस्थितीने सभास्थळ खचाखच भरले होते.दुपारी ३.३० वाजता राहुल गांधी यांचे सभास्थळी आगमण झाले. यावेळी त्यांनी हात उंचावून जनतेला अभिवादन करताच उपस्थितांनी राहुल गांधी ‘आगे बढो’च्या घोषणा दिल्या. चव्हाण पुढे म्हणाले, भाजपच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले आहे. त्यांनी बेटी बचाओ, बेटी पढोओचा नारा दिला. मात्र ‘भाजपवालो से बेटी बचाओ’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी गंभीर टीकाही त्यांनी केली.राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकऱ्यांची दैना झाली आहे. शेतमालाचे भाव कमी झाले. हमीभाव मिळत नाही. शेतकरी अडचणीत आले आहेत. बेरोजगारांचा रोजगार हिरावला गेला. देशातील कायदा व सुवव्यवस्था अडचणीत आली आहे. देश अधोगतीकडे जात आहे. ज्यांच्या हातात देशाची सूत्रे दिली तो चौकीदार म्हणताच अशोक चव्हणांचे वाक्य जनेतेने ‘चोर निघाला’ म्हणत पूर्ण केले. त्या चौकीदाराने देशाची संपत्ती लुटून नेल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला.चहावाल्याने देश तर दूधवाल्याने चंद्रपूर जिल्हा बरबाद केला - वडेट्टीवारचहावाल्याने देश बरबाद केला आणि दूधवाल्याने चंद्रपूर जिल्हा बरबाद केला, हा दूधवाला १५ वर्षे खासदार म्हणून निष्क्रिय ठरला, अशी टीका काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. खासदाराने कोणतेही काम केले नाही. आता तो मंत्री आहे. नवीन उद्योग जिल्ह्यात आले नाही. बेरोजगारांचा एकही प्रश्न सुटला नाही. रेल्वेचे दोन थांबे दिले. देशाला वाचवायचे असेल, लोकशाही टिकवायची असेल आणि हुकुमशाही संपवायची असेल, तर काँग्रेसशिवाय गत्यंतर नाही, असा हल्लाबोलही आ. वडेट्टीवार यांनी केला. दारूवाला की दूधवाला पाहिजे, असे म्हणतात. बाळू धानोरकरांकडे २० वर्षांपासून परवाना आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. मग दारूबंदी झाली का, असा सवाल करीत आता ५० रुपयांची दारू २०० रुपयांना मिळते, असाही आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

राहुल गांधी दिल्या गुडी पाडव्याच्या शुभेच्छाकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाला सुरूवात करताच मराठी सण गुडी पाडव्याच्या उपस्थित जनसमुदायाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019