: वरोरा तालुका विधी सेवा समितीद्वारा १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये झटपट निकाल लावणार असून, त्यांना दिलासा मिळणार आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा न्यायाधीश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष डी. के. भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा तालुक्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
चालू वर्षात प्रथमच ही राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होऊन आपले प्रकरण विविध सोप्या प्रक्रियेद्वारा निकाली काढण्याची संधी पक्षकारांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका विधी सेवा समिती, वरोराद्वारे करण्यात आले आहे.