शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

‘लॉकडाऊन‘मध्ये जि. प. शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मार्गदर्शक चित्रे, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध विषयांचे चित्राच्या माध्यमातून भिंतीवर रेखाटन केले आहे. या चित्रांमुळे शाळा व परिसरातील भिंती बोलक्या झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या बोलक्या भिंतीतून ज्ञान मिळणार आहे.

ठळक मुद्देसीईओंचे प्रोत्साहन : शिक्षकांकडून सुट्यांचा सदुपयोग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीत जि. प. शाळांना सुट्टी असल्याने शिक्षकांनी ई लर्निंग कंटेंट, उत्तरपत्रिकांची तपासणी व निकालपत्र संबंधित कामकाजाकरिता उपस्थित राहताना कलावंताच्या सहकार्याने शाळांच्या भिंती विविध चित्रांद्वारे बोलक्या केल्या आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी मार्गदर्शक चित्रे, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध विषयांचे चित्राच्या माध्यमातून भिंतीवर रेखाटन केले आहे. या चित्रांमुळे शाळा व परिसरातील भिंती बोलक्या झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यानंतर या बोलक्या भिंतीतून ज्ञान मिळणार आहे.चंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने उल्लेखनीय कार्य केले. मे व जून महिन्यात शाळा आकर्षक केल्या. सरपंच डॉ. शरद रणदीवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुर्योधन वाघमारे, गट शिक्षणाधिकारी समाधान भसारकर, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज आवारी, केंद्रप्रमुख रत्नमाला खोब्रागडे यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक नामदेव आस्वले व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून गणेश आर्ट चंद्र्रपूर, क्षितीज शिवकर भद्रावती, विनोद ठमके भद्रावती या चित्रकारांनी शाळेतील भिंतीचा कायापालट केला आहे.आनंददायी शिक्षणाची गोडीसावली तालुक्यातील करगाव केंद्र्र पाथरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनेही सरपंच धनराज लांडगे, शाळा समितीचे अध्यक्ष शरद नागापूरे, गट शिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, केंद्रप्रमुख प्रमोद नान्हे यांच्या सहकार्याने भिंती बोलक्या केल्या आहेत. मुख्याध्यापक बी.एम. मेश्राम, ए. एम मानकर, टी.डी नैताम यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची गोडी लावण्यासाठी ही चित्रे प्रेरणादायी ठरणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद