शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

गुगल मॅपमध्ये चुकीच्या स्थानी चुकीच्या स्थळांचे लोकेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:21 IST

नवे मार्गदेखील अपडेट नाही: अधिकच्या अंतराचे दाखवले जातात मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना: गुगल मॅप ही गुगलने विकसित केलेली मोफत ऑनलाइन नकाशा सेवा आहे. ज्याचा उपयोग विविध स्थानांची नकाशावर माहिती शोधण्यासाठी व मार्गदर्शन मिळवण्यासाठी होतो. यामध्ये रस्ते शहर, गावे, हॉटेल, दुकाने, पर्यटनस्थळे इत्यादींची माहिती मिळते. तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शनसुद्धा मिळते. यात वाहतुकीची स्थिती, सार्वजनिक वाहतूक सायकलिंग पादचारी मार्ग इत्यादींची माहिती असते. परंतु, कोरपना तालुक्यात गुगलने मॅप केलेली बरीचशी माहिती चुकीचे मार्गदर्शन करणारी आढळली आहे.

परिणामी गुगलच्या आधारावर मार्गदर्शन मिळवणे अडचणीचे ठरते आहे. या दृष्टीने गुगल मॅपमध्ये सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कोरपना तालुक्याला लागून असलेली तेलंगणा राज्याची सीमासुद्धा महाराष्ट्राच्या हद्दीत आली आहे. त्यामुळे नेमका हा भूभाग महाराष्ट्राचा की तेलंगणाचा हे कळायला मार्ग नाही. याचबरोबर अनेक गावांचे लोकेशन गाव एकीकडे आणि लोकेशन दुसऱ्या गावाकडे असे अंकित केले. यात प्रामुख्याने तालुक्यातील सावलहिरा, टांगाळा, थिप्पा, खैरगाव, येरगव्हान, कोडशी खू, पिपरी, झोटिंग, कमलापूर, हातलोणी, कुकुटबोडी, केरामबोडी यासह अनेक गावाचा समावेश आहे. यातही बऱ्याच गावांचे लोकेशन दोन स्थाने दर्शविली आहेत. ज्यामध्ये कन्हाळगाव, अंतरगाव आदीसह अनेक गावे आहेत

एक वर्ष होऊन अधिक कालावधी लोटूनसुद्धा सावलहिरा-येलापूर, पारडी-खातेरा मार्ग रहदारी योग्य होऊनसुद्धा अपडेट झाले नाही. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला रस्ता शोधायचा असल्यास दुसरा दूरच्या अंतरावरीलच मार्ग दाखवला जातो. तालुक्यातील प्रमुख असलेल्या मार्गापैकी गडचांदूर-धानोरा फाटा मार्गावर ही पैनगंगा रोड म्हणून अंकित केले आहे. परिणामी चुकीची माहिती प्रसारित होत आहे. कोरपना वणी राज्य महामार्ग क्रमांक २३६ चे राज्य महामार्ग क्रमांक ३७४ मधे परावर्तित होऊनसुद्धा जुनाच २३६ क्रमांक दाखवला आहे. देवाडा-गडचांदूर- अंतरगाव-वनोजा-आबाई फाटा मार्गावर ही राज्य महामार्ग क्रमांक ३१७ म्हणून रेखांकित करण्यात आले नाही. तालुक्यातील अनेक भागांत नव्याने बदल झाले आहे. परंतु, गुगलच्या नकाशात ते बदलसुद्धा होणे बाकी आहे. त्यामुळे अद्ययावत माहिती मिळत नाही. या अनुषंगाने गुगलने पुन्हा नव्याने अचूक माहिती साठवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही स्थिती जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अनेक गावांची आहे. 

फेसबुकच्या करंट व होमटाऊन लोकेशनमध्ये कोरपना नाही सोशल मीडिया माध्यमातील फेसबुक हे एक आघाडीचे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र, या प्लॅटफॉर्ममध्ये व्यक्तीचे करंट व होमटाऊन लोकेशन दर्शवायचे असल्यास ज्यामध्ये कोरपना शहर येत नाही. त्यामुळे अन्यत्र शहराची माहिती द्यावी लागते आहे. तालुक्यातील गडचांदूर व आवारपूर ही ठिकाणे दर्शवून आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरपनासह अन्य लोकेशन अद्यावत करण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरgoogleगुगल