वीज वितरण कार्यालयाला नागरिकांनी ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:42 AM2019-08-31T00:42:48+5:302019-08-31T00:43:30+5:30

मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही.

Locals lock down power distribution office | वीज वितरण कार्यालयाला नागरिकांनी ठोकले कुलूप

वीज वितरण कार्यालयाला नागरिकांनी ठोकले कुलूप

Next
ठळक मुद्देग्राहक आक्रमक : मीटर रिंडींग चुकीचे होत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील झोपडपट्टीवासींनी झोपडपट्टी विकास संघटनेच्या नेतृत्वात बुधवारी दुपारी कुलुप ठोकले होते. दरम्यान, तात्काळ समस्या दूर केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अभियंता सचिन बदखल यांना निवेदनातून देण्यात आला आहे.
मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दर महिन्याला युनीट तपासणी करण्यासाठी न येता घर बंद आहे, असे दाखवून अंदाजे युनिटवर बिल पाठवितात. संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे सामान्य ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. वीज बिलाविषयी ग्राहक तक्रार करण्यास कार्यालयात गेल्यास समजावून न सांगता उद्दटपणाने वागतात, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे गरीब ग्राहक कार्यालयात जाण्यासाठी घाबरतात. हा अन्यास दूर करण्याच्या हेतुने सदोष मीटर तपासणीसाठी समिती नेमावी. नियमित वीज पुरवठा करताना ग्राहकांना चुकीचे बिल येऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक होते. परंतु, याकडे दुर्लक्ष होत आहे. निवेदन देऊनही दखल घेतल्या जात नाही, असा आरोप करून कार्यालयाला कुलुप ठोकण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व झोपडट्टी संघटना अध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी केले. आंदोलनात संघटनेचे रामेश्वर देवगडे, मनिष मोगरे, नजमुद्दीन सय्यद, लता इंदूरकर, शोभा अल्लीवार, मंगेश सोमूलकर, सचिन, नंदी वाघमारे आदींसह शेकडो वीज ग्राहक सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या -
शहरातील झोपडपट्टी परिसरात राहणाºया ग्राहकांचे मीटर दुरूस्त करावे.
प्रामुख्याने याच परिसरातील ग्राहकांच्या मीटरचे रिंडींग योग्य पद्धतीने केल्या जात नाही. त्यामुळे वाजवीपेक्षा अधिक बिल येण्याचे प्रमाण वाढले. या परिसरात सर्वसामान्य ग्राहकांची संख्या अधिक आहे. चुकीचे बिल पाठविल्याने ते कदापि भरणे शक्य होत नाही.
वीज मीटरमध्ये बिघाड झाल्यास तात्काळ दुरूस्ती करण्यासाठी वीज कंपनीने या परिसरात कर्मचाऱ्यांना पाठवावे.

Web Title: Locals lock down power distribution office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.