शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

३० वर्षानंतर प्रकाशाने उजळला झोपडपट्टी परिसर

By admin | Updated: March 30, 2017 00:47 IST

आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते.

गुढी पाडव्याचा मुहुर्त : आतापर्यंत अंधाराचेच होते अधिराज्यगोंडपिपरी : आदिवासी जमातीचे झोपडपट्टीधारक मागील ३० वर्षापासून अंधाराचा सामना करीत जगत होते. ३० वर्षाच्या काळात या आदिवासींना अनेक नेते आश्वासन देवून गेलेत. मात्र या काळोख्या अंधारात जगणाऱ्या आदिवासींची परिस्थिती जैसे थेच होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत नगरपंचायतीचे उपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी सदर मागणी विद्युत वितरण कंपनीकडे रेटून धरली. त्यामुळे गौर यांच्या सहकार्यातून प्रभाग क्र. १३ मधील आदिवासींच्या झोपेड्यांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लख्ख प्रकाश मिळाला. यामुळे झोपडपट्टीवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.गोंडपिपरी शहरातील प्रभाग क्र. १३ मागील ३० ते ३५ वर्षांपासून विकासाच्या दृष्टीकोनातून पिछाडीवर होता. अशातच काट्या- गोट्यांनी बरबरटलेल्या या प्रभागात आदिवासी जमातीचे, टिनटप्परचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आपल्या कुटुंबासोबत झोपडपट्या बांधून येथे राहत आहेत. या झोपड्यातून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत मागील तीस वर्ष झोपडपट्टीवासीयांनी काढलेत. या तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांचे मतदार यादीत नावेही आलीत व ते गोंडपिपरीचे रहिवाशीही झालेत. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढे येईना? निवडणूक आली तरच प्रभाग क्रमांक १३ उमेदवारांना दिसत होता. मतदान मिळविण्यासाठी अनेक उमेदवार समस्या सोडविण्याचे आश्वासन देत होते. परंतु आज ३० वर्षाच्या कार्यकाळात आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. या आदिवासी बांधवांच्या जीवन संघर्षाची माहिती नगरपंचायतीचे उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती चेतनसिंह गौर यांना मिळाली. त्यांनी पहिल्यांदा या प्रभागात विद्युत पुरवठा करण्याचा निश्चय केला आणि सदर समस्येच्या सोडवणुकीसाठी विद्युत वितरण कंपनीकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला. चेतनसिंह गौर यांच्या पाठपुराव्याची विद्युत वितरण कंपनीने दखल घेतली व आदिवासी सुधारणा योजने अंतर्गत अहेरी राज्य महामार्गावरुन प्राची गॅस एजन्सी समोरच्या रोडवरुन सात पोल टाकलेत आणि गुढीपाडव्याच्या शुभमूहुर्तावर येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी झोपडपट्टीवासीयांच्या झोपड्यात प्रकाश आला. आदिवासी जमातीचे हे कुटुंब व्यावसायाने टिनटप्पर विकणारे. त्यांची विजेची समस्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. अनेकदा या त्या नेत्यांकडे जावूनही कुणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. मात्र त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी चेतनसिंह गौर पुढे सरसावल्याने त्यांच्या झोपड्या प्रकाशाने उजळल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)मागील तीस वर्षापासून आम्ही दिवाबत्तीत राहत होतो. सभोवताल झाडेझुडपे आहे. जीव मुठीत घेवून रहावे लागत होते. साप, विंचू यासारख्या अनेक विषारी प्राण्यांचा सामना करावा लागला. आता मात्र विजेची सोय उपलब्ध झाल्याने आमच्या आदिवासी बांधवामध्ये आनंद पसरला आहे.- शंकर येलय्या परचाके