शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

आयुष्य क्रम नाही तर उपक्रम मानून जगा

By admin | Updated: January 25, 2016 01:22 IST

आव्हानं अंगावर घेणे आणि ते पेलणे, यात जे सुख असते, ते मोठे आहे. ज्यांना या सुखाची सवय लागते ते सुखाचा

चंद्रपूर : आव्हानं अंगावर घेणे आणि ते पेलणे, यात जे सुख असते, ते मोठे आहे. ज्यांना या सुखाची सवय लागते ते सुखाचा शॉर्टकट घेत नाही. आयुष्य क्रम मानून जगू नका, अनुकरण जगू नका, ते उपक्रम मानून जगा, असा सल्ला सुप्रसिध्द व्यंगचित्रकार, सिध्दहस्त लेखक मनोहर सप्रे यांनी दिला.लोकाग्रणी अ‍ॅड. बळवंत राघव उपाख्य बाबासाहेब देशमुख स्मृती १३ वा चंद्रपूर भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आज रविवारी येथील सरदार पटेल महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, इंदुमती सप्रे व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी मनोहर सप्रे पुढे म्हणाले, समस्या नसलेले आयुष्य आपणाला कधीच आवडले नाही. समस्या हुडकून काढायच्या आणि त्या सोडवायच्या. यातील आनंद मोठा आहे. कोणताही गुरु नसताना आयुष्यभर स्वत:ला धडा शिकवित राहिलो. आर्ट आॅफ लिव्हिंगसारखा आर्ट आॅफ डार्इंगही सर्वांनी शिकावे. सरकारी नोकरी, सुखाचे आयुष्य मिळाले असतानाही आपले त्यात रमले नाही. संकटच नाही, तिथे काही करायलाही वाव नाही. त्यामुळे नोकरी सोडून स्वत:चे आयुष्य स्वत:ला पटेल, असे जगणे सुरू केले. पत्नी इंदूमती हीदेखील आपल्या पाठिशी सदैव उभी राहिल्याचे सांगत ते म्हणाले, बदकं उडत नाही, याचे मला दु:ख नाही, गरुड पंख विसरतात, याचे दु:ख आहे.यावेळी डॉ. अभय बंग म्हणाले, अमेरिकेत बाहेरचे लोक आले आणि त्यांनी अमेरिकेला मोठे केले. तसेच मनोहर सप्रे यांनीही बाहेरुन येऊन चंद्रपूरला मोठे केले आहे. ज्या काळात नोकरी म्हणजे सर्वकाही असायचे, त्या काळात सप्रे यांनी आपल्या तत्वांसाठी नोकरी सोडली. ही सोपी गोष्ट नाही. पाठीचा कणा ताठ ठेवून जगण्यासाठी मनोहररावांनी अनेक आव्हाने लिलया पेलल्याचेही त्यांनी सांगितले. शेवटी मनोहर सप्रे यांच्या सन्मानार्थ एखादी उत्तम व्याख्यानमाला आयोजित करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे म्हणाले, मनोहर सप्रे यांचा चंद्रपुरात सन्मान व्हावा, अशी अनेकांची इच्छा होती. लोकाग्रणी बाबासाहेब देशमुख स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने हा सन्मान होत आहे, याचा आपल्याला अतिशय आनंद आहे. सप्रेंच्या काष्ठशिल्पाचे प्रदर्शन लावण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तत्पूर्वी शांताराम पोटदुखे व डॉ. अभय बंग यांच्या हस्ते मनोहर सप्रे यांचा १३ वा चंद्रपूर भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी इंदुमती सप्रे यांचाही साडीचोळी देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. संचालन राजा बोझावार यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)