चंद्रपूर : बल्लारपूर येथील दरोडा प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. राजू रोहिदास मोर्या (४३) रा. कानपूर (उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.३ मे २००३ रोजी बल्लारपूर शहरातील गणपती वॉर्ड येथे चार अनोळखी इसमांनी चोरी करण्याच्या उद्देशाने गट करून विजयराज सोनी (२६) रा. गणपती वॉर्ड बल्लारपूर यांच्या अंगणात प्रवेश केला. सोनी हे अंगणात खाटेवर झोपून असताना, त्यांना मारहाण करून पोटावर चाकूने वार केला. यात गंभीर जखमी झालेले सोनी यांनी आरडाओरड केला. तेव्हा आरोपी पळून गेले. सोनी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा नोंदविला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक ए.टी. राठोड यांनी पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केले.सुनावणीदरम्यान न्यायालयाने साक्षीदार तपासले व पुराव्याच्या आधारे शनिवारी मुख्य आरोपी राजू रोहिदास मोर्या (४३) रा. कानपूर (उत्तर प्रदेश) यास जन्मठेप व १०० रुपये दंड ठोठावलेला.तर इतर चार आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. या प्रकरणामध्ये सरकारतर्फे अॅड. जयंत साळवे चंद्रपूर यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
दरोडाप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
By admin | Updated: February 23, 2015 01:15 IST