जिल्ह्यातील वाचनालये गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:00 AM2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:21+5:30

वर्षांनुवर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही हाती काहीच लागत नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी अभ्यास सोडून छोटा-मोठा व्यवसाय करणे सुरु केले आहे. मात्र प्रत्येकांनाच ते जमण्यासारखे नसल्याने आज-ना उद्या पदभरती होतील. या आशेवर जिल्ह्यातील हजारो युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी विविध विषयांचे क्लॉससुद्धा लावले आहे.

The libraries in the district were swollen with crowds | जिल्ह्यातील वाचनालये गर्दीने फुलले

जिल्ह्यातील वाचनालये गर्दीने फुलले

Next
ठळक मुद्देअनेकांनी सुरु केला अभ्यास : नव्या सरकारकडून बेरोजगारांच्या आशा वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत शासकीय नोकरभरतीच होत नसल्याने युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. असे असले तरी नव्या सरकारने महापोर्टलची चौकशी करण्याचे आदेश दिल्याने आता नोकरभरती होतील, या आशेने जिल्ह्यातील बेरोजगारांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आहे. त्यामुळे वाचनालये गर्दीने फुलले आहे.
शिक्षण घेऊन सहजासहजी शासकीय नोकरी मिळत नसल्याने जिल्ह्यातील बेरोजगार तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून पाहिजे तशी शासकीय नोकरभरतीच घेण्यात आली नसल्याने बेरोजगारांमध्ये नाराजीचा सुर आहे. त्यामुळे काहींनी अभ्यास करणे सोडून दिले. मात्र नवे सरकार स्थापन होताच बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.
वर्षांनुवर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करूनही हाती काहीच लागत नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी अभ्यास सोडून छोटा-मोठा व्यवसाय करणे सुरु केले आहे. मात्र प्रत्येकांनाच ते जमण्यासारखे नसल्याने आज-ना उद्या पदभरती होतील. या आशेवर जिल्ह्यातील हजारो युवकांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी विविध विषयांचे क्लॉससुद्धा लावले आहे. पदभरती निघेल आणि आपल्याला शासकीय नोकरीत काम करण्याची संधी मिळेल, या आशेवर या युवकांची धडपड सुरु आहे.
चंद्रपूर शहराचा विचार केल्यास शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाचनालये आहे. ज्युबिली हायस्कूल परिसरात असलेले शासकीय वाचनालय, श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय, बाबा आमटे अभ्यासिका या व्यतिरिक्त शहरात काही संस्था, संघटना वाचनालयेही सुरु केले आहे. या वाचनालयांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये सध्या गर्दी वाढली असून वाचनालये गर्दीने फुलले आहे.
बेरोजगार युवकांना नव्या शासनाकडून आशा असून पदभरती निघाल्यास आपण मागे पडू नये, या आशेवर सदर बेरोजगार युवक पुन्हा त्याच जोमाने अभ्यासाकडे वळले आहे. मात्र त्यांची आशा नवे सरकार पूर्ण करते की, पुन्हा त्यांना केवळ अभ्यासच करावा लागतो. हे येणारा काळच सांगणार आहे.

औद्योगिक जिल्ह्यात रोजगाराची वानवा
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र स्थानिक बेरोजगारांच्या हाताला कामच मिळत नसल्याची ओरड आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक खासगी उद्योग बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी काहींनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला आहे. मात्र पदभरती होत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा येत आहे.
नव्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या
मागील काही वर्षांमध्ये शासकीय पदभरती पाहिजे तशी झालीच नसल्याने बेरोजगार युवकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संघटनांनी यासंदर्भात आंदोलने, मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र फारसा फायदा झाला नाही. दरम्यान, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर या बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या असून नवे सरकार पदभरती करतील, अशी अपेक्षा सध्या बेरोजगार युवकांनी व्यक्त केली आहे.

मागील सरकारच्या काळामध्ये अपवाद वगळता पदभरती झालीच नाही. जी झाली त्यामध्ये महापोर्टलचा सर्वत्र गोंधळ बघायला मिळाला. त्यामुळे बेरोजगारांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. नवेसरकार स्थापन झाल्यानंतर महापोर्टलची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हे सरकार नोकर भरतीसाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.
-पुष्पकांत डोंगरे, चंद्रपूर

मागील दोन ते तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहोत. मात्र पदभरतीच झाली नसल्याने अभ्यास सुरुच ठेवला आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सध्या विद्यार्थ्यांची वाचनालयांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे.
-प्रफुल्ल बोरकर, सावली

Web Title: The libraries in the district were swollen with crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.