लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : कोरोना आणि वन्यप्राण्यांची दहशत, यामुळे तेंदूपाने हंगामापासूनही वंचित राहवे लागेल, या चिंतेत मजूर होते. परंतु वन विभागाने ही बाब लक्षात घेऊन अखेर कोरोनाबाबत सुरक्षित अंतर राखून वन कर्मचाºयाच्या संरक्षणात तेंदूपाने तोडण्याचे काम राजुरा आणि धाबा वनक्षेत्रात सुरु करण्यात आले आहे. वन विभागाचे या निर्णयाचे ग्रामस्थानी स्वागत केले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील धाबा वनक्षेत्रात चार युनिट असून ४० तेंदूपाने संकलन केंद्र आहेत तर राजुरा वन परिक्षेत्रात तीन युनिट असून २२ तेंदू संकलन केंद्र आहेत. यामुळे या भागातील सुमारे २२ गावातील २५ हजारापेक्षा अधिक लोकाना तेंदूपाने संकलनातून रोजगार मिळाला आहे. परंतु या भागात मागील काही महिन्यांपासून वाघाची चांगलीच दहशत असल्याने लोक तेंदूपाने आणण्यास भीती बाळगून होते. त्यामुळे त्यांचा नगदी स्वरूपाच्या हा हंगाम वाया जाणार अशी चिंता होती.गावकऱ्यांची घातली समजूतग्रामस्थ चिंतेत असल्याचे पाहून अखेर वरिष्ठ वनअधिकाºयांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनीे या गावात जाऊन लोकांची समजूत घातली. तसेच तेंदुपाने गोळा करीत असलेल्या भागात वन कर्मचारी संरक्षण देणार, अशी हमी दिली.त्यानंतर रविवारपासून वनकर्मचाºयांच्या संरक्षणात आणि कोरोनाबाबत सुरक्षित अंतर राखून राजुरा तालुक्यातील चुनाळा, चनाखा, विहीरगाव, कापनगाव, खांबाला, मूर्ती तसेच धाबा वन परिक्षेत्रातील तोहोगाव, लाठी, वेजगाव, डोंगरगाव, धाबा गावात तेंदू सकलन करण्यात येत आहे.वन कर्मचारी या भागात वन्यप्राणी येऊ नये म्हणून फटाके फोडत, डफरे वाजवीत मजुरांचे संरक्षण करीत आहेत. दररोज या भागातील पाणवठयावर ट्रॅप कॅमेराद्वारे वन्यप्राण्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या कामात मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
वनकर्मचाऱ्याच्या संरक्षणात तेंदूपाने संकलन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा : कोरोना आणि वन्यप्राण्यांची दहशत, यामुळे तेंदूपाने हंगामापासूनही वंचित राहवे लागेल, या चिंतेत मजूर होते. ...
वनकर्मचाऱ्याच्या संरक्षणात तेंदूपाने संकलन सुरु
ठळक मुद्देवन्यप्राण्यांची भीती : मध्य चांदा वनविभागाचा उपक्रम