लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रातील महादवाडी बिटातील कक्ष क्रमांक ३५७ मध्ये सोमवारी सकाळी जखमी अवस्थेत बिबट्याचा बछडा आढळल्याने वन विभागात खळबळ उडाली. या बछड्याला आरआरटी, एसटीपीओ व बफर झोन क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून चंद्रपूर येथील ट्रॉन्झिस्ट ट्रिटमेंट सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. हा बछडा एक ते दीड वर्षाचा असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.एसटीपीओची चमू सकाळी सात वाजताच्या सुमारास महादवाडी परिसरात गस्त घालत असताना एका मोठ्या पाईपच्या शेजारी जखमी अवस्थेत बिबट्याचा बछडा आढळला. याबाबतची माहिती बफ्फर क्षेत्राच्या वनपरीक्षेत्र अधिकारी एस. जे. बोबडे यांना देण्यात आली. बफरचे सर्व कर्मचारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे आरआरटी पथक, एसटीपीओ पथकांच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन तास शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद केले.दुपारी त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रॉन्झिस्ट ट्रिटमेंट सेंटरला उपचारासाठी पाठवण्यात आले. बिबट्यावर उपचार सुरू असून जखमी होण्याचे कारण अद्याप पुढे आले नाही. यावेळी वनपरीक्षेत्र अधिकारी एस. जे. बोबडे, चिचपल्ली वनक्षेत्राचे राजुरकर, एसटीपीओच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण, डॉ. रविकांत खोब्रागडे आदी उपस्थित होते.
जखमी अवस्थेत आढळला बिबट्याचा बछडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST
बफ्फर क्षेत्राच्या वनपरीक्षेत्र अधिकारी एस. जे. बोबडे यांना देण्यात आली. बफरचे सर्व कर्मचारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे आरआरटी पथक, एसटीपीओ पथकांच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे तीन तास शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद केले.
जखमी अवस्थेत आढळला बिबट्याचा बछडा
ठळक मुद्देमहादवाडी वन कक्षातील घटना : बिबट्यावर ट्रॉन्झिस्ट ट्रिटमेंटमध्ये उपचार