शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पानठेले बंद; मात्र बाजुलाच मिळतो खर्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

चंद्रपूर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये --कोरोनाचे रूग उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांसह प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करीत आहे. कोरोनाबाधित रूग्णाच्या थुंकी अथवा नाका-तोंडावाटे बाहेर पडणारा सूक्ष्म द्रव दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरात गेल्यास कोरोनाची लागण होते.

ठळक मुद्देगल्लीबोळात सर्रास विक्री : कोरोना नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाबाधित व्यक्तीच्या थुंकीवाटे कोरोना पसरतो. परिणामी जिल्ह्यात कुठेही पानटपऱ्या उघडण्यास अद्याप जिल्हा प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे चंद्रपुरातील पानटपऱ्या बंद आहेत. मात्र खºर्याची विक्री नियमित सुरू आहे. बंद पानटपऱ्याच्या बाजुलाच सर्रास खर्रा विक्री केली जाते.चंद्रपूर शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये --कोरोनाचे रूग उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांसह प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करीत आहे. कोरोनाबाधित रूग्णाच्या थुंकी अथवा नाका-तोंडावाटे बाहेर पडणारा सूक्ष्म द्रव दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरात गेल्यास कोरोनाची लागण होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पानटपऱ्या उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. असे असले तरी पानटपरी व्यावसायिकांनी अनधिकृतपणे खर्रा विकणे सुरू ठेवले आहे. महापालिकेसह संबंधित विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. याचाच गैरफायदा घेत पानटपरी व्यावसायिकांनी आपला व्यवसाय आणखी तेजीत आणला आहे.शहरातील सर्वच कॉलनी आणि रस्त्यावर व शहरातील गल्लीबोळात खर्रा सहज उपलब्ध होत असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, मिलन चौक, भानापेठ, जटपुरा गेट परिसर, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक, जनता कॉलेज चौक, नगिनाबाग, घुटकाळा वार्ड, बाबुपेठ, जगन्नाथ बाबा नगर, सिस्टर कॉलनी यासह शहरातील जवळजवळ सर्वच भागात चालता-फिरता खºर्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाला याची माहिती नाही, हे शक्य नाही. तरीही याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे.सुगंधित तंबाखू मुबलकशासनाने सुगंधित तंबाखू विक्री व उत्पादनावर बंदी घातली आहे. तरीही सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री सुरू होती. आता कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सुगंधित तंबाखूपासून बनणाऱ्या खºर्यावरही बंदी आली आहे. तरीही खर्रा तयार करण्यासाठी पानटपरी चालकांकडे सर्रास सुगंधित तंबाखू उपलब्ध होत आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी