लीकेजमुळे पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:50 PM2019-03-17T22:50:54+5:302019-03-17T22:51:30+5:30

येथील तुकूम परिसरात धांडे हॉस्पीटल जवळ असलेल्या चर्च रोड परिसरात लीकेजमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्येच पाण्याचा अपव्यह होत असतानाही संबंधितांना अद्यापपर्यंत तरी जाग आली नाही. त्यामुळे पाणी वाचवा, पाणी जिरवाचा नेमका संदेश कुणासाठी, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Leakage causes water wastage | लीकेजमुळे पाण्याचा अपव्यय

लीकेजमुळे पाण्याचा अपव्यय

Next
ठळक मुद्देप्रशासनाची डोळेझाक : पाणी वाचविण्याचा संदेश नेमका कुणाला?

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील तुकूम परिसरात धांडे हॉस्पीटल जवळ असलेल्या चर्च रोड परिसरात लीकेजमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्येच पाण्याचा अपव्यह होत असतानाही संबंधितांना अद्यापपर्यंत तरी जाग आली नाही. त्यामुळे पाणी वाचवा, पाणी जिरवाचा नेमका संदेश कुणासाठी, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक थेंबाची किंमत येथील नागरिकांना आहे. असे असले तरी लीकेजमुळे पाणी वाचविण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनाला याचे काही देणे नसल्याचे या लिकेजमुळे दिसते. मागील १५ दिवसांपासून लिकेज असतानाही तो बंद करण्यासाठी कुणीच पुढाकार घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे, या लिकेजमुळे रस्त्यावर पाणी येत असल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मागील वर्र्षी या रस्त्याचे सिमेंटीकरण तसेच सौंदर्यीकरण करण्यात आले. त्यामुळे शहरातील चांगल्या रस्त्यांमध्ये या रस्त्याची नवी ओळख आहे. याच रस्त्याने ख्रिचन रुग्णालय असल्याने सारखी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील पाण्यामुळे रुग्णांसह सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील लिकेज दुरुस्त करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाण्यासाठी धावपळ
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक पाण्याच्या थेंबाला महत्त्व असते. मात्र येथील लिकेजमुळे शेकडो लिटर पाणी वाया जात असताना दुसरीकडे हंडाभक पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. तर काहींच्या घरी नळाद्वारे पाणीच येत नसल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे लिकेज दुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
 

Web Title: Leakage causes water wastage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.