शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

मुनगंटीवारांसारखा नेता पंजाबला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 22:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार वर्षात विकासकामांचा जो झंझावात ...

ठळक मुद्देसोनू सूद : बल्लारपूर येथे होममिनिस्टर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चार वर्षात विकासकामांचा जो झंझावात दाखविला, त्याची माहिती मिळताच सोनू सूदसारखा कलावंतही भारावून गेला. ना. मुनगंटीवारांच्या कामातील सुसूत्रता आणि नियोजनबद्धता बघून सुधीर मुनगंटीवारांसारखा नेता पंजाब राज्यालाही हवा आहे, अशी प्रांजळ कबुलीच प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी दिली.राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांमार्फ त दुर्गापूर येथील पालकमंत्री फुटबॉल चषक स्पर्धेत पाहुणे म्हणून सोनू सूद मंगळवारी येथे आले होते. यावेळी सोनू सूद यांनी वरील प्रतिक्रिया दिली.ना. मुनगंटीवार यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास कामांना बघून मी अतिशय प्रभावित झालो आहे. असा एखादा नेता माझ्या पंजाब प्रांतामध्येही हवा आहे, असेही अभिनेता सोनू सूद म्हणाले.बल्लारपूर नगर परिषदेतर्फे आयोजित होममिनिस्टर या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आयोजित कार्यक्रमालाही सिनेअभिनेते सोनु सूद उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी बिपीन मुग्धा, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे व नगरपरिषेदेचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना अभिनेता सोनू सूद यांनी उपस्थित जनसमुदायाला स्वत:च्या शारीरिक क्षमतेवर अधिक भर देणे गरजे असल्याचे स्पष्ट केले. स्वत:चे आरोग्य उत्तम राहील, यासाठी व्यायाम ही सवय बनवा, असे आवाहनही केले. आपल्या चित्रपटाचे काही संवाद त्यांनी यावेळी सादर करून उपस्थितांकडून दाद मिळविली.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर शहरामध्ये गेल्या काही वर्षात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा यावेळी सादर केला. कार्यक्रमाचे संचालन शब्बीर अली व जांभूळकर यांनी केले.सोनू सूद यांनी डोळ्यात साठविला चंद्रपूर व बल्लारपूरचा विकासराज्याचे अर्थ, नियोजन व वन सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत:ला विकासकामात झोकून दिले. प्रत्येक काम देशपातळीवर पहिल्या क्रमांकाचे झाले पाहिजे, असा त्यांचा नेहमी अट्टाहास राहतो. अभिनेता सोनू सूद यांनी या दौऱ्यादरम्यान ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली विकासकामे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितली. अनेक कामांविषयी त्यांनी वृत्तपत्रातून माहिती जाणून घेतली. याबाबत सोनू सुद म्हणाले, मी मूळचा पंजाब राज्याचा रहिवासी आहे. मात्र पंजाबमध्येदेखील अशा पद्धतीचा विकास कामाचा झंझावात मला बघायला मिळाला नाही. यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा विकासासाठी स्वत:ला झोकून देणारा नेता हवा आहे, असे कार्यक्रमप्रसंगी अभिनेता सोनू सूद यांच्या तोंडून सहज निघाले.