शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र कोसळधार, ग्रामीण जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 05:00 IST

अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले. कोरपना-आदिलाबाद या राज्य मार्गावरील कन्हाळगाव येथील नाल्याला पूर आला आहे. परिणामी, हा मार्ग बंद आहे. परसोडा नाल्यावर पाणी आल्याने, तसेच जांभूळझरा-मांडवा मार्गही बंद आहे. कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातही नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. रविवारी दिवसभर पावसाने उसंत दिली नाही. त्यामुळे  नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. कोरपना-आदिलाबाद हा राज्यमार्ग, तसेच चिमूर-वरोरा हा रस्ता बंद पडला आहे. जिवती तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांत पाणी घुसले, तर चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे भिंत कोसळली. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, चंद्रपूर शहरातही जलमय स्थिती बघायला मिळाला. अनेक सकल भागांमध्ये पाणी साचले.कोरपना-आदिलाबाद या राज्य मार्गावरील कन्हाळगाव येथील नाल्याला पूर आला आहे. परिणामी, हा मार्ग बंद आहे. परसोडा नाल्यावर पाणी आल्याने, तसेच जांभूळझरा-मांडवा मार्गही बंद आहे. कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातही नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गांगलवाडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंदेवाही तालुक्यातही हिच स्थिती आहे. चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथील सीताराम गुरुनुले यांच्या घराची भिंत कोसळली. यामुळे संसारोपयोगी साहित्य मातीत दबले. मूल तालुक्यातही नद्या, नाल्या दुथडी भरून वाहत आहे. या परिसरात ७० टक्के पेरण्या आटोपल्या आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पेरलेले बियाणे कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिवती तालुक्यात पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर