शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

३६२ कोटींच्या नवीन रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया झाली सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:01 IST

१२४ शेतकऱ्यांच्या जमिनींचे भागफोड : प्रकल्प परिसरात संतप्त भावना

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत खाणीतील कोळसा वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सास्ती ते बाबूपेठ, असा नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये राजुरा तालुक्यातील १२४ शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत आहे. शेतजमिनीचे तुकडे होणार असल्यामुळे भविष्यात शेती करणे अवघड होईल, या भीतीपोटी या प्रकल्पाला संबंधित शेतकऱ्यांकडून विरोध सुरू झाला आहे.

रेल्वे बोर्डाने २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सास्ती-बाबूपेठ या १३.११४ किलोमीटर लांबच्या रेल्वेलाइन प्रकल्पाला ३६२.८१ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने ९ जुलै २०२५ रोजी राजपत्र काढून या रेल्वेलाइन प्रकल्पासाठी कढोली येथील ४९ शेतकऱ्यांच्या १४.८६ हेक्टर, गोवरी येथील २६ शेतकऱ्यांच्या १९.७५ हेक्टर, तसेच मानोली येथील ४९ शेतकऱ्यांच्या ६.७५ हेक्टर, अशा एकूण १२४ शेतकऱ्यांच्या ३०८.१३ हेक्टरपैकी ४१.३७हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. १७ जुलै रोजी व एसडीओ व तहसिलदारांनी दि. २८ जुलै रोजी परिपत्रक जारी केले आहे.

प्रकल्पामुळे कोणता फायदा होणार ?नव्या रेल्वे रुळामुळे एकाच ठिकाणाहून कोळश्याची वाहतूक केली जाईल. यामुळे जडवाहनामुळे रस्त्यावर उडणारी धूळ कमी होईल. ट्रकमुळे होणारे रस्ते अपघात कमी होईल. काही प्रमाणात प्रदूषणमुक्त होईल.

रेल्वे रुळामुळे शेतकऱ्यांचे काय नुकसान होणारवेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत तीन वेगवेगळ्या कोळसा खाणी आहेत. आधीच या खाणींसह राजुरा तालुक्यातील सोन्यासारखी शेती वेकोलीच्या घशात गेली आहे. या कोळसा खाणींमुळे परिसरातील शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. प्रदूषण, पाण्याच्या समस्या, वाढती उष्णता या कारणांनी शेती करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेती तुकड्यात खरेदी करणार असल्याने भविष्यात शेती करण्याची समस्या उद्भवणार आहे. वर्धा नदी लागून असल्याने पुराचीही समस्या निर्माण होईल.

"वेकोलीसाठी असलेल्या रेल्वेलाइनसाठी शेतकऱ्यांच्या लाखमोलाच्या जमिनीचे तुकडे न करता वेकोलीने संपूर्ण जमीन अधिग्रहित करून त्या जमिनीच्या भागातून रेल्वेलाइन काढावी. जमीन अधिग्रहित करून मोबदला प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्यात याव्यात, अन्यथा आम्ही कोणत्याही परिस्थित जमीन देणार नाही."- किशोर हिंगाणे, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कढोली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर