शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणीसाठी मजुरांची मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:00 IST

मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत. यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे.

ठळक मुद्देपहाटेपासून शेतकरी मजुरांच्या दारी : शेतकरी मेटाकुटीला, कापूस वेचणीला किलोमागे १० रूपयांचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कापूस वेचणीसाठी मजुरांच्या टंचाईने शेतकरी मेटकुटीस आला आहे. पावसामुळे कापसाचे दर कोसळले आहेत. त्यातच आता वेचन्यासाठी मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत.यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कपाशीचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. चार -पाच दिवसांपासून उन्ह वाढले आहेत. त्यामुळे सर्वत्र कपाशीचे बोंडे फुटत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक तालुके असलेले कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती तसेच चंद्रपूर, गोंडपिपरी आदी तालुक्यांत कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकरी अन्य गावावरून मजूर आणून कापसाची वेचणी करीत आहेत. आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे मजुरांना वेचणीवर खर्च करावा लागत आहे. गेल्यावर्षी ५ रूपये किलोप्रमाणे प्रमाणे कापूस वेचणी शेतकऱ्यांनी दिली होती. यावेळी ती वाढली आहे.अशी करतात सीतदहीशेतातील कापूस घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात सर्वत्र दही शिंपडण्यात येते. दही शिंपडण्यापूर्वी कापसाच्या दोन झांडामध्ये वाकाचा पाळणा बांधून नव्या कापडात शेतातील पाच दगड पाण्याचे धुवून टाकण्यात येतात. यानंतर त्याची पूजा करण्यात येते.कापूस घरी नेण्यासाठी लगबगदिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपाशीची बोंड गळून पडली. तर पावसामुळे ओले झालेले बोंड सडली. यामुळे उत्पादनाची आशा मावळली. यात काही शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. कापूस शेतात ठेवणे सध्या धोक्याचे असल्याने तो वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पºहोटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेल्या कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून आता सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेती