Labor favorite for cotton milling | कापूस वेचणीसाठी मजुरांची मनधरणी
कापूस वेचणीसाठी मजुरांची मनधरणी

ठळक मुद्देपहाटेपासून शेतकरी मजुरांच्या दारी : शेतकरी मेटाकुटीला, कापूस वेचणीला किलोमागे १० रूपयांचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कापूस वेचणीसाठी मजुरांच्या टंचाईने शेतकरी मेटकुटीस आला आहे. पावसामुळे कापसाचे दर कोसळले आहेत. त्यातच आता वेचन्यासाठी मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत.
यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कपाशीचे पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे. चार -पाच दिवसांपासून उन्ह वाढले आहेत. त्यामुळे सर्वत्र कपाशीचे बोंडे फुटत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक तालुके असलेले कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती तसेच चंद्रपूर, गोंडपिपरी आदी तालुक्यांत कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकरी अन्य गावावरून मजूर आणून कापसाची वेचणी करीत आहेत. आठ ते दहा रुपये किलो प्रमाणे मजुरांना वेचणीवर खर्च करावा लागत आहे. गेल्यावर्षी ५ रूपये किलोप्रमाणे प्रमाणे कापूस वेचणी शेतकऱ्यांनी दिली होती. यावेळी ती वाढली आहे.

अशी करतात सीतदही
शेतातील कापूस घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांकडून शेतात सर्वत्र दही शिंपडण्यात येते. दही शिंपडण्यापूर्वी कापसाच्या दोन झांडामध्ये वाकाचा पाळणा बांधून नव्या कापडात शेतातील पाच दगड पाण्याचे धुवून टाकण्यात येतात. यानंतर त्याची पूजा करण्यात येते.

कापूस घरी नेण्यासाठी लगबग
दिवाळीच्या मुहूर्तावर घरी येणारा कापूस निसर्गाच्या अवकृपेने उशिरा का होईना शेतात दिसू लागला आहे. विदर्भातील शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेले हे पांढरे सोने घरी आणण्याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतातील कपाशीची बोंड गळून पडली. तर पावसामुळे ओले झालेले बोंड सडली. यामुळे उत्पादनाची आशा मावळली. यात काही शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीची बोंडे आता फुटू लागली आहेत. कापूस शेतात ठेवणे सध्या धोक्याचे असल्याने तो वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून सुरू झाले आहे. प्रारंभी विलंबाने आलेल्या पावसामुळे कपाशीची लागवड उशिराने झाली. कापूस निघण्याच्या काळात आलेल्या परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पºहोटी झोडपून काढली. या सर्व परिस्थितीत शेतात असलेल्या कापूस वेचण्याचे काम शेतकऱ्यांकडून आता सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Labor favorite for cotton milling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.