तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले गाव भारोसा त्या गावातील हिराबाई लिहिते, या रहिवासी असून त्या विधवा असल्यामुळे जवळपास सन २००३ पासून त्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहे. परंतु कोरपना तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या गलथान कामामुळे हिराबाई पुरुषोत्तम लिहिते, यांचे डिसेंबर २०२० पासून ते मे २०२१ पर्यंत असे एकूण सहा महिन्यांचे अनुदान थकीत होते. हे अनुदान थकीत असल्यामुळे हिराबाई लिहिते, यांनी तहसील कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या. परंतु त्यांना वारंवार उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. त्यामुळे त्या हतबल झाल्या होत्या. त्यांनी ही बाब भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी लाभार्थी यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयात या प्रकरणी चौकशी करून थकीत अनुदान देण्यासंदर्भात मागणी केली. त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयातून हिराबाईला थकीत अनुदान देण्यात येईल, असे लेखी देण्यात आले. त्यामुळे हिराबाईला तब्बल १० महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे.
...अखेर १० महिन्यांनंतर मिळणार निराधार हिराबाईला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:34 IST