राजकीय द्वेशातून दोन गटात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 AM2020-11-20T05:00:00+5:302020-11-20T05:00:26+5:30

विजय बावणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद सत्तार खान पठाण, आबिद अली, नगर पंचायत सदस्य सोहेल अली, शारीक मोसीम अली, नगर सेवक अमोल आसेकर, अरविंद डोहे, नितीन भास्कर मुसळे, शाहेबाज आसीब अली, अमोल सुर्यभान टोंगे, प्रमोद सत्यवान घोटेकर व अतुल आसेकर यांचेवर भादंविच्या कलाम १४७, १४८, १४९, ५०७, ४५२, ५०६, ३२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Jumped into two groups out of political hatred | राजकीय द्वेशातून दोन गटात जुंपली

राजकीय द्वेशातून दोन गटात जुंपली

Next
ठळक मुद्देकोरपन्यात राजकारण तापले : दोन्ही गटाकडील एकूण १७ जणांवर गुन्हे दाखल

  लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : येत्या काही दिवसात कोरपना नगरपंचायतीची निवडणूक असून आतापासूनच राजकीय वातावरण तापले आहे.  नगरसेवक विजय बावणे व कुटंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी ११ जणांविरुध्द तर मोहम्मद सत्तार खान यांच्या तक्रारीवरून बावणेसह कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटांच्या क्षुल्लक भांडणात एकूण १७ लोकांवर गुन्हे दाखल झाल्याने शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.
येथील मोहम्मद सत्तार खान पठाण यांनी नगरपंचायतीबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने नगरसेवक विजय बावणे व मोहम्मद सत्तार खान पठाण यांच्यात फोनवर वादावादी झाली. 
विजय बावणे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद सत्तार खान पठाण, आबिद अली, नगर पंचायत सदस्य सोहेल अली, शारीक मोसीम अली, नगर सेवक अमोल आसेकर, अरविंद डोहे, नितीन भास्कर मुसळे, शाहेबाज आसीब अली, अमोल सुर्यभान टोंगे, प्रमोद सत्यवान घोटेकर व अतुल आसेकर यांचेवर भादंविच्या कलाम १४७, १४८, १४९, ५०७, ४५२, ५०६, ३२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी साथीदारासहकोरपना नगरपंचायतीच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य नंदा बावणे यांच्या घरात घुसून त्यांचा मुलगा नितीन बावणे यांना रस्त्यावर ओढत नेले. नंदा बावणे, सुनील बावणे व विजय बावणे बचावाकरिता गेले असता आरोपींनी लाठयाकाठयांनी सर्वांना मारहाण केल्याची फिर्याद नंदा बावणे यांनी कोरपना पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून कोरपना पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

बावणे कुटुंबीयांकडूनही धमकी
मोहम्मद सत्तार खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदस्य विजय बावणे, नितीन बावणे, सुनील बावणे, नगरपंचायतचे उपाध्यक्ष मनोहर चन्ने, स्वप्नील गाभणे, पियुष कावळे इत्यादीं विरुद्ध मोहमद सत्तार खान पठाण यांना फोनवरून मारपीट करण्याची धमकी देऊन आपल्या समर्थकांसह पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, ५०६, ५०७, २९४, ३३२ व ४५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  एकंदरीत कोरपना नगरपंचायतीची निवडणूक समोर असल्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणे सुरू झाले आहे. यामुळे कोरपना शहरामध्ये वातावरण तापले आहे.
कोरपना येथील व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे दोन्ही गटात वाद झाला. त्यामुळे दोन्ही गटाने एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या. दोन्ही गटाकडील  तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.
-अरुण गुरनुले , ठाणेदार, कोरपना

Web Title: Jumped into two groups out of political hatred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.