शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा ते कोरपना दीडशे किमीचा प्रवास पायदळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 22:02 IST

तेलंगणातून आलेल्या मजुरांची भेट जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली यांच्याशी कोरपना बसस्थानक परिसरात झाली. त्यांनी जाण्यासाठी पैसा नाही. धान्य नाही. सकाळपासून उपाशीच पायदळ चालत आलो आहे, अशी परिस्थिती कथन करून पुन्हा अर्धा प्रवास गाठणे कठीण आहे, असे सांगितले. यातील तीन व्यक्ती वृध्द असल्याने याबाबतची माहिती अली यांनी कोरपनाचे ठाणेदार अरूण गुरनुले यांना दिली.

ठळक मुद्देमजुरांना दिले भोजन : पोलिसांच्या मदतीने स्वगावी जाण्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील राजन गट्टा गावातील बारा मजूर चना व गहू कटाईच्या कामासाठी तेलंगणा राज्यातील बोथ येथे गेले होते. संचारबंदी लागू झाल्यानंतर त्यांची कुठलीच राहण्याची व्यवस्था न करता शेतमालकाने परतून लावले. त्यांनी १५० किलोमीटरचा पायदळ प्रवास करत कोरपना गाठले. येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून स्वगावी जाण्याचीही व्यवस्था करून दिली.तेलंगणातून आलेल्या मजुरांची भेट जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली यांच्याशी कोरपना बसस्थानक परिसरात झाली. त्यांनी जाण्यासाठी पैसा नाही. धान्य नाही. सकाळपासून उपाशीच पायदळ चालत आलो आहे, अशी परिस्थिती कथन करून पुन्हा अर्धा प्रवास गाठणे कठीण आहे, असे सांगितले. यातील तीन व्यक्ती वृध्द असल्याने याबाबतची माहिती अली यांनी कोरपनाचे ठाणेदार अरूण गुरनुले यांना दिली. मजूर उपाशी असल्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्था आबीद अली यांनी अबरार अली व नगरसेवक सोहेल अली यांच्या सहकार्याने देवघाट येथे करून दिली. त्यानंतर पोलिसांकडून गावी जाण्यासंबंधी पत्र देऊन जाण्याची व्यवस्था केली. यावेळी नईम शेख, शादाब अली, नौशाद अली, शहेबाज अली आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक