चंदा शिरसाट : ब्लॅकमेलिंगला थारा देऊ नकावरोरा : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ शाखा वरोरा आणि लॉर्ड बुद्धा टी.व्ही. चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने गिताश्री मंगल कार्यालय येथे पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष चंदाताई शिरसाट होत्या. उद्घाटन पी.एन. बोढे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गजानन हरणे, ओमकार चेके, राजेश सोलापन, विनोद पन्नासे, पुरुषोत्तम चौधरी, मोरेश्वर चंदनखेडे, डोंगरे, प्रमोद गवारकर, अकील अख्तर आदी उपस्थित होते.प्रदेशाध्यक्षा चंदाताई शिरसाट म्हणाल्या की, पत्रकार हा समाजाचा आरसा असावा. सत्याच्या बाजूने सदैव ठामपणे उभे राहावे. ब्लॅकमेलिंगच्या फंदात पडणाऱ्या पत्रकारांना आपल्या पत्रकार संघात अजिबात थारा देवू नका आणि प्रामाणिक पत्रकारावर अन्याय झाल्यास आपली संघटना त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी करा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भातील पत्रकारांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान विद्रोही कवी खेमराज भोयर यांचा व डॉ. मनोज तेलंग यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अॅड. अकिल अख्तर, संचालन सुनील शिरसाट व आभार प्रदर्शन ओम चावरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संजय गायकवाड, मुजाहीद कुरेशी, अहेफाज शेख, रसील तुरमरकर, भीमराव शेंडे, ज्योत्सना खोब्रागडे, उषा मुन, ज्योती नगराळे, विजया पाटील, साधना काळे, माया सगदेवे, गायकवाड, मेश्राम यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
वरोऱ्याला पत्रकारांची कार्यशाळा
By admin | Updated: August 26, 2016 00:56 IST