शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:46 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा-महाविद्यालय आणि वॉर्डावॉर्डात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देरॅलीने दुमदुमले शहर : छत्रपतींना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा-महाविद्यालय आणि वॉर्डावॉर्डात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. चंद्रपुरातील पटेल हॉयस्कूलजवळील शिवाजी चौकात अनेक संघटनांनी येऊन शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यासोबत चंद्रपुरातील विविध संघटनांनी शोभायात्रा, रॅली काढली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर चंद्रपुरातील रस्त्यावरून ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा गजर ऐकू येत होता. दरम्यान, चंद्रपुरातील श्यामनगर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक राजेश मून, नगरसेविका जयश्री जुमडे, राजेंद्र तिवारी, विनोद शेरकी, प्रा. रवी जोगी, अ‍ॅड. सारिका संदूरकर, शशीकांत मस्की, डॉ. मनोज कुपरने, सोमेश्वर राऊत, रामभाऊ ढगे, महेंद्र जुमडे, दिनकर सोमलकर, श्रीनिवास मेकल यांच्यासह अनेक मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती लाभली होती.आपल्या भाषणात ना. अहीर म्हणाले, शिवरायांनी असामान्य शौर्य व कर्तृत्वाच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली व मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त केले. मात्र यासाठी छत्रपतींच्या मावळ्यांनी स्वराज्य रक्षणार्थ जे शौर्य गाजवले, त्या इतिहासाचे स्मरण देशवासीयांना असल्याने या शौर्याचा इतिहास आमच्या शुरवीर सैन्यांच्याही हृदय सिंहासनावर कोरला गेला आहे. त्यामुळे राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपले शीर तळहातावर घेऊन मुघलांची औलाद असलेल्या आतंकवाद्यांशी वर्षांनुवर्षे लढावे लागत आहे. यात अनेकांना वीरमरण आले असले तरी पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्यात ज्या ४२ जवानांनी शहीदत्व पत्करले, त्यांचे बलीदान व्यर्थ जावु न देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. त्याची परिनिती देशवासीयांना लवकरच बघायला मिळेल, असा दृढविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक मान्यवरांनी प्रसंगोचित मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांनी शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून शिवजयंती उत्सव साजरा केला. यावेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते.