शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री घरात शिरणारा ‘तो’ चोर नव्हे तर निघाला प्रियकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 18:56 IST

Chandrapur News रात्रीच्या वेळी हळूच घरात शिरणारा तो तरुण चोर नसून तिथे राहणाऱ्या मुलीचा प्रियकर असल्याचे अखेरीस उघड झाले.

चंद्रपूर : गुरुवारी रात्री १ वाजता वरोरा पोलीस ठाण्यात एक फोन येतो, की बोर्डा गावातील एका नगरीत एका घरी चोर शिरला आहे. त्यानुसार वरोरा पोलीस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी रवाना होते. गावातील तरुणांच्या मदतीने रात्री १.३० वाजण्याच्या दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल होतात. त्या चोराला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविताच तो तरुण कबुली देतो, चोर नसून त्या घरातील मुलीचा प्रियकर असल्याची.

बोर्डा येथील एका कुटुंबातील मुलीची आई व भाऊ कामानिमित्त बाहेरगावी गेले. वडील व मुलगी एकटीच असल्याची संधी साधून एक तरुण रात्री एक वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील मार्गाने घरात शिरला. ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घरमालकांना फोन करून सांगितले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्या तरुणाला एका खोलीत बंद करून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्या खोलीचे दार उघडून तरुणाला खोलीबाहेर आणत त्याला फटके देण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो तरुण पोपटासारखा बोलायला लागला. सत्य कळल्यानंतर सर्वच अवाक् झाले. तो चोर नसून स्वतःला त्या मुलीचा प्रियकर असल्याचे सांगत आहे. हा तरुण यात्रा वार्ड, वरोरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी ताब्यात घेत त्याची दुचाकीदेखील जप्त केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकJara hatkeजरा हटके