शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

चंद्रपुरातील मानवी तस्करी प्रकरणाचा तपास सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST

दहा वर्षांपूर्वी चंद्रपुरातील बालिकेचे अपहरण करुन हरियाणा राज्यात विक्री केल्याच्या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील ११ आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध घेणे सुरु आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून सदर गुन्ह्याचा पोलीस तपास चालु असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभा तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवारांच्या प्रश्नाला गृहमंत्र्यांचे उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दहा वर्षांपूर्वी चंद्रपुरातील बालिकेचे अपहरण करुन हरियाणा राज्यात विक्री केल्याच्या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील ११ आरोपींना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध घेणे सुरु आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून सदर गुन्ह्याचा पोलीस तपास चालु असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभा तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलेल्या मूळ तारांकित प्रश्नाच्या उत्तरात गृहमंत्र्यांनी वरील माहिती दिली. दहा वर्षांबपूर्वी चंद्रपुरातील महाकाली मंदिर परिसरातून एका बालिकेचे अपहरण करुन हरियाणात तिची विक्री करण्यात आली. तिचा सात वेळा विवाह करुन दोनदा मातृत्व लादल. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मूळ प्रश्नाद्वारे आ. मुनगंटीवार यांनी केली.चंद्रपूर तालुक्यातील वायगाव मोकासा येथील शिवारातील पांदन रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली असता पांदन रस्त्याचे बांधकाम रोजगार हमीच्या वार्षिक नियोजन आराखडा सन २०२०-२१ मध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती रो.हो.यो. मंत्री सांदीपान भुमरे यांनी दिली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक