शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

माती कलेचा आविष्कार कालबाह्य

By admin | Updated: February 8, 2015 23:31 IST

श्रमाने मातीचेही सोने बनते तर श्रमावाचून सोन्याचीही माती होते, हाच प्रत्यय भद्रावती येथील परंपरागत व्यवसायाबाबत आज अनुभवायला मिळत आहे. ज्या व्यवसायांसाठी भद्रावती सर्वत्र प्रसिद्ध होती

सचिन सरपटवार - भद्रावतीश्रमाने मातीचेही सोने बनते तर श्रमावाचून सोन्याचीही माती होते, हाच प्रत्यय भद्रावती येथील परंपरागत व्यवसायाबाबत आज अनुभवायला मिळत आहे. ज्या व्यवसायांसाठी भद्रावती सर्वत्र प्रसिद्ध होती तेच व्यवसाय आता फक्त आठवणीतले होत आहे. यातीलच एक व्यवसाय म्हणजे येथील कुंभार समाजाचा व्यवसाय. मात्र मातीचा हा कलाअविष्कार आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. बदलत्या आधुनिक यंत्रयुगात कुंभार समाजाची उदरभरणाची साधणे कालाबाह्य झाल्यामुळे या समाजासमोर जीवन जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. शासनाने या समाजाकडे लक्ष न दिल्यामुळे आता कुंभार समाजावर उपासमारीची पाळी आली आहे. हा समाज आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या मागास राहिलेला आहे. कुंभार समाजाच्या व्यवसायाबाबत शासनाने आपले धोरण शिथिल केल्यास हा व्यवसाय भरभराटीस येऊ शकतो.कुंभार समाजाच्या अद्वितीय कलाकृतीचा अविष्कार म्हणजे मातीच्या गोळ्यापासून तयार केलेल्या वस्तु. परंतु, आज तलावातून ही माती सुद्धा त्यांना विकत घ्यावी लागत आहे. भद्रावतीत कुंभार समाजाची जवळपास १२५ ते १४० घर आहेत. मातीपासून माठ, राजन, कुंड्या, सुरई, दिवा लावणी, तावे, गाडगं, येरणी, स्वयंपाकासाठी तपिल, भाकरीसाठी खापर (तावा), मूर्ती, मातीचे हत्ती, आसनिस्या भुलई इत्यादी वस्तु तयार करुन हे लोक आपला उदरनिर्वाह करीत आहे. परंतु आज प्लॉस्टिक स्टील, फायबर वस्तुंनी या व्यवसायावर संक्रात आणली आहे.भद्रावतीत अनेक पिढ्यांपासून कुंभार समाज हा व्यवसाय करीत आहे. प्रत्येकाच्या घरात, अंगणात, खुल्या जागेवर थरावर मातीच्या तयार केलेल्या वस्तू दिसतात. मातीच्या वस्तू भाजणे, पक्क्या करणे व बाजारात विक्रीला नेणे हा सुरुवातीला जणुकाही नित्यनियम होता. पहिल टोपल्यात वस्तू टाकूण डोक्यावर नेणे नंतर गाढव व बैलबंडीवर तर आता वाहनांत या वस्तू विक्रीस आणल्या जातात. गवराळा तसेच पिंडोणी बोडीतून काळी माती आणली जात होती. आता हिच माती कुंभारांना विकत घ्यावी लागत आहे. तसेच भट्टीसाठी लागणाऱ्या काड्याही उपलब्ध नाही. यावर बंदी असल्याने व्यवसाय करावा तर कसा, हा प्रश्न समाजबांधवांसमोर आहे.