शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश

By admin | Updated: June 4, 2017 00:26 IST

जिल्हयातील दुर्गम भागात मंजूर झालेल्या योजना वेगवेगळया यंत्रणांच्या समन्वयाअभावी रखडलेल्या आहेत.

हंसराज अहीर : एसडीओंवर प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची जबाबदारीचंद्रपूर : जिल्हयातील दुर्गम भागात मंजूर झालेल्या योजना वेगवेगळया यंत्रणांच्या समन्वयाअभावी रखडलेल्या आहेत. या योजना सुरळीत सुरु होण्यासाठी नेमक्या कारणांचे विश्लेषण करुन त्यावर उपाय सुचविणारे अहवाल महिनाभरात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी शुक्रवारीे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत साफल्य भवन येथे आयोजित राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व शहरी पाणी पुरवठा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आले होती. यावेळी ना. अहीर बोलत होते.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे, आ. अ‍ॅड.संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, मनपा आयुक्त संजय काकडे, वरोराचे नगराध्यक्ष एहतेशाम अली, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, मनपा उपमहापौर अनिल फुलझले, जिल्हा परिषद सभापती अर्चना जिवतोडे, ब्रीजभूषण पाझारे, गोदावरी केंद्रे, संतोष तंगरपल्लीवार, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा समन्वय समितीचे सदस्य खुशाल बोंडे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपविभाग निहाय आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी परस्पर यंत्रणेचा समन्वयाचा अभाव योजना आकार घेताना अडथळा झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आगामी काळात त्या अडचणी दूर करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी दिले. राजुरा, जिवती आदी ग्रामीण भागामध्ये काही योजना अनेक महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे लोकप्रतिनिधींनी बैठकीमध्ये लक्षात आणून दिले. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी रखडलेल्या योजनांनिहाय तपासणी केली असता अधिक चांगला परस्पर समन्वय सर्व यंत्रणामध्ये ठेवण्याची गरज असल्याचे दिसून आले. जिल्हयात सद्या ७ कोटी ६४ लाख रुपयांच्या ६४ योजना रखडल्या आहेत. त्यामध्ये चंद्रपूर-२, पोंभुर्णा-३, भद्रावती-३, चिमूर-१७, वरोरा-२, राजुरा-१३, कोरपना-४, जिवती-१०, सिंदेवाही-२, मूल-२, सावली-४, नागभीड-२ आदी योजनांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांपासून ३७ योजना रखडलेल्या आहेत. त्या सर्व योजनांची कारणमिमांसा करण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या रखडलेल्या योजना पूर्ण शक्तीनिशी सुरु होण्यासाठी योग्य अहवाल देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. याच बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडयाचा आढावा घेण्यात आला. ६५३ गावांमध्ये ९ कोटी ८६ लाख रुपयांच्या ८६२ उपाययोजना सुचविण्यात आल्या असून कामे सुरु असल्याचे जिल्हयातील अधिकऱ्यांनी स्पष्ट केले.