शहरं
Join us  
Trending Stories
1
"अयोध्येत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे..."; राहुल गांधी यांनी लगावला सणसणीत टोला
2
भाजपचे नवे अध्यक्ष मागासवर्गीय किंवा ओबीसी?; विनोद तावडेंनंतर आता नव्या नेत्याचे नाव आघाडीवर
3
"सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा"; लक्ष्मण हाकेंचे शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार नाही
4
WI vs AFG : वेस्ट इंडिजच्या विजयाचा चौकार! १०४ धावांनी सामना जिंकला; अफगाणिस्तानचा विजयरथ रोखला
5
शेअर बाजारात पुन्हा गॅप अप ओपनिंग, निफ्टी-सेन्सेक्स ऑल टाईम हाय लेव्हलवर
6
पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकला, खासदार निलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, कारण...
7
विमान खरेदी करणारे पहिले भारतीय, घालायचे २४८ कोटींचा 'पटियाला नेकलेस'; रंजक आहे 'या' महाराजांची कहाणी
8
"एक फोटो दीजिए ना...", चाहत्याच्या आग्रहासमोर धोनीने मानली हार, माहीचा भारी Video
9
वायनाडमधून प्रियंका गांधी किती मतांनी विजयी होतील? पोटनिवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेत्याची भविष्यवाणी
10
मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सिम कार्ड बंद ठेवल्यास आता बसणार दंड?
11
T20 WC 24, WI vs AFG  : एकाच षटकात ३६ धावा! निकोलस पूरनने रचला इतिहास, शतक मात्र हुकले
12
उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक: एक डबा जागेवरच उडाला; चालकाच्या एका चुकीमुळे ९ प्रवाशांचा मृत्यू
13
Investment Share Market : बाजारात कमाईची मोठी संधी, दोन डझन कंपन्या आणणार ३० हजार कोटींचे आयपीओ
14
विशेष लेख: NEET भविष्यात खरंच 'नेटकी' होईल ?
15
अखेर 'पुष्पा २' ची रिलीज डेट लॉक, या तारखेला थिएटर गाजवायला येणार अल्लू अर्जुन
16
आजचे राशीभविष्य, १८ जून २०२४ : कर्कसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
18
थेट किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईची पर्यटक तरुणी जखमी; अचानक वारा सुटला अन्...
19
WI vs AFG Live : पूरनचे थोडक्यात शतक हुकले! विडिंजने रूद्रावतार दाखवला; अफगाणिस्तानची धुलाई
20
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा

रुग्णालयातील सेवांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:06 PM

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडीकल कॉलेज) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी ....

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दिले आदेश : जिल्हाधिकाºयांच्या नेतृत्त्वात पाच सदस्यीय समितीचे गठन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडीकल कॉलेज) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी आता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय चौकशी समितीचे गठन केले आहे. ही समिती बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती आणि सुधारणांबाबतचा अहवाल लवकरच सादर करणार आहे.चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत येणा-या जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा ही राज्यातील प्रगत रुग्ण सेवा झाली पाहिजे. यासाठी या ठिकाणच्या बालमृत्यू प्रकरणातील वस्तुस्थिती शोधून काढण्यात यावी. या ठिकाणचा मृत्यूदर शून्य आणण्यासाठी सर्व साधनसुविधांची उपलब्धता करुन देण्यात यावी. जिल्हयातील आरोग्य यंत्रणा बळकट व्हावी, तसेच महाराष्ट्रातील अद्ययावत नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून चंद्रपूरला नाव लैकिक मिळावा. यासाठी सद्यास्थितीत सूचवायच्या उपाय योजनांसाठी ही पाच सदस्यीय समिती काम करणार आहे.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवा, उपलब्ध औषधांचा पुरवठा, बाल व ज्येष्ठांचे अतिदक्षता विभागाची स्थिती. या ठिकाणी रात्री व दिवसा काम करणा-या वैद्यकीय अधिकाºयांची उपलब्धता सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असणाºया सोयी सुविधा, डॉक्टर व रुग्णांसाठी आवश्यक असणा-या सुरक्षा यंत्रणांची उपस्थिती. या परिसरातील सुरक्षा व्यवस्था, प्रलंबित बांधकाम व आदी विषयावर ही समिती आपला अहवाल पालकमंत्र्यांना देणार आहे.‘लोकमत’ने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात ६८ दिवसांत ८० बालमृत्यूचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. यानंतर ‘लोकमत’ने रुग्णालयात आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले असल्याची बाब वृत्तमालिकेतून उघड केली होती. या वृत्त मालिकेची राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवा यांनी याकड गांभिर्याने लक्ष वेधले.यानंतर ना. मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील सेवांबाबत संबंधित अधिकाºयांच्या वेळावेळी बैठका घेऊन येथील सुविधांचा आढावा घेतला. मुंबई मंत्रालयात दोन बैठका गेल्या आठवडयात घेतल्या होत्या. यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.शनिवारी व रविवारी त्यांनी चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करुन जिल्हयातील आरोग्य यंत्रणेबाबत माहिती घेतली. जिल्हयातील ५४ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटी करणासाठी पालकमंत्री प्रयत्नशिल आहेत.ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, असे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिले आहेत. सर्व वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मुंबईला निघण्यापूर्वी त्यांनी या पाच सदस्यीय चौकशी समितीची घोषणा केली. या समितीमध्ये जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्यासह अन्य तीन जणांचा समावेश आहे.