शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:23 AM

जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांची अल्प वेतनात बोळवण केली जात आहे. हा अन्याय दूर करावी, अशी मागणी काँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देसमस्या : निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांची अल्प वेतनात बोळवण केली जात आहे. हा अन्याय दूर करावी, अशी मागणी काँग्रेसने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.निवेदनात, कंत्राटी कामगारांना दोन ते चार हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळते. भविष्य निर्वाह निधीसुद्धा ठेकेदारांकडून भरला जात नाही. आरोग्य विभागाच्या कामगारांनी शासनाच्या नियमाप्रमाणे वाढीव वेतन मिळण्याकरिता निवेदन देवूनही दखल घेतली नाही. दरम्यान, मे २०१६ ला कामगारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसांचे उपोषण केले होते. तत्कालीन कामगार आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्राच्या आधारावर आंदोलन सुटले. आंदोलनाची दखल घेवून सहायक कामगार आयुक्तांनी चंद्रपुरात बैठक घेतली. तालुकास्तरीय झोन तीनमध्ये असलेल्या कामगारांना २६ दिवसीय कामांचे वेतन सहा ते सात हजार द्यावे.भविष्य निर्वाह निधीचा संबंधित कंत्राटदाराने भरणा करावा, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कामगारांवरील अन्याय दर करावा. महानगरपालिका झोन २ करिता ८ हजार ३२८ ते ९ हजार ५२८ रुपये २६ दिवसीय कामगारास वेतन व भविष्य निर्वाह निधी द्यावे, असा आदेश शासनाने जारी केला. आरोग्य विभागातील कामे घेणाºया सर्व कंत्राटदारांनाही हा नियम लागू असताना जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नाही. शासन परिपत्रक व सहाय्यक कामगार आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसविण्यात आले.त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हा प्रश्न तातडीने सोडवून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे छोटु शेख यांनी एका शिष्टमंडळामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :collectorतहसीलदार