शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:18 IST

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी कृषी विभागाने कोरपना तालुक्यातील शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळीही त्यांना प्रादूर्भाव होत असल्याचे आढळले.

ठळक मुद्देसूर्यनारायणाचे दर्शन नाहीच : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी कृषी विभागाने कोरपना तालुक्यातील शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळीही त्यांना प्रादूर्भाव होत असल्याचे आढळले.मागीलवर्षी लष्करी अळीने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. ही अळी साधारणत: ८० पिकांवर उपजिविका करु शकते. मादी एका जीवनकाळात हजार ते दीड हजार अंडी घालू शकते व ही कीड एका रात्रीतून १०० किलोमीटरचा प्रवास करु शकते.पहिल्या व दुसºया अवस्थेतील लष्करी अळ्या पाने खुरबडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसून येतात. अळी तिसऱ्या अवस्थेत पाने खाण्यास सुरुवात करते व पानाला छिद्र करते. सहाव्या अवस्थेत अळी अधिरपणे पाने खावून मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकते. १० टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळून अल्यास थायोमेथोक्झाम १२.६ अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के तीन मिली किंवा पिनोटेरम ११.७ टक्के एसपी ४ मिली किंवा क्लोरॅट्रॅलीप्रोल १८.५ एस.सी. चार मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास या रोगांचा प्रादूर्भाव काहीसा कमी करता येणार आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतामागील काही दिवसांपासून दररोज येणाऱ्या सरींमुळे कीटकनाशकावरील फवारणी व्यर्थ ठरत आहे. तणनाशकाच्या फवारणीअभावी पिकात तण वाढून पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. तण काढण्यासाठी मजुरांची कमी, मजुरीचे वाढते दर या सर्व अडचणींनी उत्पादन कमी होणार, ही चिंता शेतकºयाला आहे. मागील काही दिवसांपासून सूर्याचे दर्शन झाले नाही. आणखी किती दिवस हेच वातावरण राहणार, हे अनिश्चित आहे. दररोज ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस कोसळत आहे. सूर्यप्रकाशाअभावी सोयाबिनवर चक्रभुंगा अळी,कापसावर चुरडा तर तुरीवर पाने गुंडाळणारी अळी तर भाजीपाल्यावर पाने कुरतडणाऱ्या अळ्यांचा मोठा प्रभाव दिसत आहे. परिणामी, सोयाबिनची चाळण होत आहे. चुरड्यामुळे कापसाच्या झाडांची वाढ थांबली आहे. तर सततच्या रिपरिपमुळे सखल भागातील तुरीची झाडे करपत आहेत. शेंडे गुंडाळणाºया अळीमुळे तुरीचे पीक संकटात आले आहे. रोगाच्या प्रभावाबरोबर पोषक वातावरण असल्याने पिकात तणाची वाढ होत आहे. ढगाळ वातावरण व दररोज येणाºया पावसाच्या सरी फवारणीसाठी अडचणीच्या ठरत आहेत. मजुरांची मोठी चणचण असून मजूर मिळणे कठीण झाले आहे. मिळाले तरी मजुरीचे दर व मजूर आणण्यासाठी करावा लागणारा वाहन खर्च, अतिरिक्त सहन करावा लागत आहे. आधी उशिरा पेरणी, दरम्यान पावसाची दीर्घ विश्रांती आणि आता पावसाची सतत रिपरिप यामुळे पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे शेतीचा खर्च वाढणार असला तरी उत्पादन घटणार, यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी