लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : कन्हाळगाव शिवारात १२ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सोमवारी युवा क्रांती संघटनेसह शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा देऊन उपविभागीय कार्यालयासमोर अभिनव भजन आनंदोलन केले.२६ डिसेंबरपासून विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वेच्छा निवृत्तीधारक कृषी सहाय्यक निलेश राठोड यांच्यासमवेत शेकडो शेतकरी साखळी उपोषणाला बसले आहेत. मात्र, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने शेतकºयांमध्ये तीव संताप व्यक्त होत आहे. शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी बेहरे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनोद शर्मा, राकेश नांदूरकर, राजू शर्मा, बबलू सोनवणे, शुभम अगडे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.कोतवालांचे आंदोलन सुरूचमहाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय परिसरात मागील १७ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे विद्यार्थी व शेतकºयांची कामे रखडली आहेत.केरोसीन फेडरेशनचे उपोषणकेरोसीन विक्रेत्यांवरील अन्यायविरूद्ध केरोसीन फेडरेशनच्या वतीने सोमवारी उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी केरोसीन हॉकर्स फेडरेशन अध्यक्ष सुरेश कामडी, महासचिव राजू लोणारे, घनश्याम रामटेके, नितीन पोहरे, विषवनाथ इंदूरकर, राजू पिसे संतोष पंधरे व तालुक्याभरातील ४५ केरोसीन परवानाधारक उपोषणाला बसले आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 23:13 IST
कन्हाळगाव शिवारात १२ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला सोमवारी युवा क्रांती संघटनेसह शहरातील विविध सामाजिक संघटनांनी पाठींबा देऊन उपविभागीय कार्यालयासमोर अभिनव भजन आनंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा
ठळक मुद्देसोमवार ठरला ‘आंदोलन’वार : युवा क्रांती संघटनेचे भजन आंदोलन