शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

सदस्यांच्या नवनवीन प्रयोगामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ

By admin | Updated: October 10, 2015 00:18 IST

चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतीने आपले उत्पन्न ...

पाटण ग्रामपंचायत : ३० टक्के पदाधिकारी युवापाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतीने आपले उत्पन्न वाढीसाठी केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगामुळे इतर ग्रामपंचायतीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडली आहे. पाटण ग्रामपंचायतीमध्ये एकूण ९ सदस्य आहेत. त्यातील ६० टक्के युवक पदाधिकारी असल्याने त्यांनी आपल्या विचारातून ग्रामपंचायतीला मिळणारे उत्पन्न कसे वाढविता येईल, यासाठी धडपड करून नवीन इमारत बांधून ती बँकेला भाड्याने दिले व इतर पाच इमारती शाळा व राहण्यासाठी भाड्याने दिले. यातून ८० हजार रुपये उत्पन्न येत असून बाजार लिलाव १ लाख २० हजार रूपये, पाणी कर व गृह कर २ लाख २५ हजार व २०१४-१५ चे तंटामुक्त समितीला तीन लाखाचे पुरस्कार मिळाले. या उत्पन्नातून ग्रामपंचायतीचे नोकरदार यांचे पगार, ग्रामपंचायत किरकोळ काम, इमारत देखभाल दुरुस्ती, १० टक्के रक्कम महिला व बालकल्याण, २० टक्के रक्कम मागासवर्गीय खर्च, नाली सफाई कार्यालयीन खर्च, आरोग्य स्वच्छता अशा कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. नुकतेच ग्रामपंचायत इमारतीची रंगरंगोटी व डिजीटल ग्रामपंचायत करण्यात आली. या ग्रामपंचायतीमध्ये एकूण सहा गावे आहेत. सितागुडा, लचमागुडा, जनकापूर, पंडीतगुडा, पाटागुडा आणि पाटण या सहा गावांची लोकसंख्या २ हजार ३०० एवढी आहे. ग्राम विकास अधिकारी येरमे व सरपंच सीताराम मडावी यांच्या सहकार्याने ही सर्व कामे पार पाडली जात असून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडली आहे. ग्रामपंचायतीने लचमागुडा वासीयांना १०० टक्के घरकूल मिळवून दिले असून पिण्याच्या पाण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करुन पाणी गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे. ग्रामपंचायतीतर्फे बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेसाठी गेल्या वर्षी व या वर्षी ग्रामपंचायत पात्र ठरली आहे. विविध योजनातून सिमेंट काँक्रीट रस्ते, नळ योजनेद्वार पाण्याची सोय उपलब्ध करून गावकऱ्यांना उपलब्ध करून दिल्यामुळे गाव विकासाच्या वाटेवर आहे. (वार्ताहर)