शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रीचे वाढले टार्गेट; भरणार 21 कोटींचा गल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 05:00 IST

१ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. राज्यातील सत्ता बदलानंतर २७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने दारूबंदी हटविली. प्रत्यक्षात ७ जून २०२१ पासून दारूविक्री सुरू झाली. जिल्ह्याला एप्रिल २०२२ पर्यंत १५ कोटींचा महसूल मिळाला आहे. डॉ. कुणाल खेमनार समितीने मार्च २०२० मध्ये अहवाल कॅबिनेटपुढे सादर केला. समितीपुढे ४३ हजार ६२७ निवेदन दारूबंदी उठवण्यासाठी तर २५ हजार ८२७  हे दारूबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य मंत्रिमंडळाने २७ मे २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यावर शिक्कामोर्तब केले. या घटनेला बुधवारी एक वर्षे पूर्ण होत आहे. दारू विक्रीतून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला १५ कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान,  दारू विक्रीचा वेग लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाला २० कोटी ७५ लाखांचा टार्गेट देण्यात आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदीसाठी संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर अनेक संघटना हे काम करीत होत्या; पण चंद्रपुरात ५ जून २०१० ला दारूबंदीचा खरा लढा सुरू झाला. चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूल श्रमिक एल्गार संघटनेने दारूबंदीची मागणी करणाऱ्या संघटनांना संघटित केले. ४ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२० रोजी दारूबंदीच्या मागणीसाठी चिमूर ते नागपूर पदयात्रा (विधानसभेवर) काढण्यात आली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आवाज उठविला. त्यामुळे फेब्रुवारी २०११ मध्ये तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती तयार केली.समितीने  फेब्रुवारी २०१२ मध्ये मुख्यमंत्र्यांना अहवाल सुपुर्द केला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. राज्यातील सत्ता बदलानंतर २७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने दारूबंदी हटविली. प्रत्यक्षात ७ जून २०२१ पासून दारूविक्री सुरू झाली. जिल्ह्याला एप्रिल २०२२ पर्यंत १५ कोटींचा महसूल मिळाला आहे.

२ लाख ८२ हजार सूचना आल्याडॉ. कुणाल खेमनार समितीने मार्च २०२० मध्ये अहवाल कॅबिनेटपुढे सादर केला. समितीपुढे ४३ हजार ६२७ निवेदन दारूबंदी उठवण्यासाठी तर २५ हजार ८२७  हे दारूबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आली होती.

१३ सदस्यांची झा समितीमंत्रालयात पुन्हा उच्चस्तरीय बैठक झाली, या बैठकीत आणखी एक समिती स्थापून आढावा घेण्याचे निश्चित झाले. दारूबंदीबाबत अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी १२ जानेवारी २०२१ रोजी १३ सदस्यांची झा समिती गठित झाली. या समितीने ११ मार्चला सरकारला अहवाल दिला. 

दारूबंदी हटविण्यासाठी नेमके काय-काय घडले ?३ फेब्रुवारी २०२० पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना समिती गठित करण्याचे निर्देश दिले.  दारूबंदीचे फायदे व तोटे याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. खेमनार यांच्या अध्यक्षेखाली समीक्षा समितीने १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२० पर्यंत लिखित स्वरूपात अभिप्राय मागविले होते. 

२७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने हटविली दारूबंदीझा समितीच्या शिफारशीनंतर राज्य मंत्रिमंडळाने २७ मे २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ७ जून २०२१ पासून जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू झाली. आता दुकानाची संख्या वाढली.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी