गोंडमहासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

By Admin | Updated: December 25, 2014 23:29 IST2014-12-25T23:29:29+5:302014-12-25T23:29:29+5:30

अखिल भारतीय गोंडवाना गोंड महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन आज गुरुवारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिशुपाल शौरी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाले. सोबतच देवप्रतिष्ठा आणि शक्ती

Inauguration of Gondham Sabha National Convention | गोंडमहासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

गोंडमहासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

बल्लारपूर :अखिल भारतीय गोंडवाना गोंड महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन आज गुरुवारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिशुपाल शौरी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाले. सोबतच देवप्रतिष्ठा आणि शक्ती कलशाची स्थापनाही करण्यात आली.
युवक युवतींनी केलेल्या पारंपारिक रेला नृत्याच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत झाले. मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष शिशुपाल शौरी, नगराध्यक्षा छाया मडावी, धर्मगुरु तिरुमाल शेरसिह आचला, महासंघाचे राज्य संयोजक मुर्लीधर टेकाम, दिवाकर पेंदाम, जिल्हाध्यक्ष चरणदास शेडमाके, तरुण नैताम, आदिलाबादचे आमदार नागोराव मसराम, तेनसिंह कर्राम, राष्ट्रीय उपाध्यक्ष अर्जून शिडाम, अत्ना जंगू, गोंडी धर्माचार्य मोतीरावण कंगाली आदींची प्रमुख उपस्थिती होती. या अधिवेशनात आसाम, बोर्डा, झारखंड, पं. बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना, आंध्रप्रदेश इत्याची दूरवरच्या भागातून आलेल्या समाज बांधवांना मंचावर आमंत्रित करुन, त्या सर्वाचे पाहुण्यांच्या हस्ते अक्षता लावून स्वागत करण्यात आले. स्वागतपर भाषणात दिवाकर पेंदाम यांनी २५ ते २७ डिसेंबरला होणारे हे दहावे राष्ट्रीय अधिवेशन आहे आणि यात निदान एक लाख समाज बांधव नक्की सहभागी होतील, असे सांगितले. यासोबतच गोंडी व आदिवासींच्या समस्यांवर लोकप्रतिनिधी, विचारवंत विचार मांडतील, मार्गदर्शन करतील. या समस्याबाबत पुढचे पाऊल काय हे या अधिवेशनात ठरविले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी आमदार नामदेव उसेंडी यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. संचालन संतोष आत्राम यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of Gondham Sabha National Convention