शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

ड्रॅगन फळ लागवडीतून पहिल्याच वर्षी त्या शेतकऱ्याने घेतले लाखाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 23:24 IST

वरोरा तालुक्यातील आबमक्ता येथील युवा शेतकरी मनीष पसारे यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाच्या शेतीचा अभ्यास केला. त्याला वरोरा तालुका कृषी विभाग शेगाव, मंडळ अधिकारी विजय काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ड्रॅगनवेल कॅक्टससारखे दिसते. लातूर जिल्ह्यातून रोपे आणण्यात आली. रोपाला दीड लाख रुपये खर्च आला. एक एकर शेतात बेड तयार करून जून महिन्यात दोन फूट अंतरावर ट्रेलर पद्धतीने लागवड केली. 

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : उष्ण कटिबंध वातावरणात ड्रॅगन फळांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन घेता येते. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सव्वा वर्षापूर्वी  एका एकरात ड्रॅगन फळाची लागवड केली. पहिल्याच वर्षात एक लाख रुपयांचे नगदी उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे. या फळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने नागरिक फळ घेण्याकरिता बांधावर जात आहेत.वरोरा तालुक्यातील आबमक्ता येथील युवा शेतकरी मनीष पसारे यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ड्रॅगन फळाच्या शेतीचा अभ्यास केला. त्याला वरोरा तालुका कृषी विभाग शेगाव, मंडळ अधिकारी विजय काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ड्रॅगनवेल कॅक्टससारखे दिसते. लातूर जिल्ह्यातून रोपे आणण्यात आली. रोपाला दीड लाख रुपये खर्च आला. एक एकर शेतात बेड तयार करून जून महिन्यात दोन फूट अंतरावर ट्रेलर पद्धतीने लागवड केली. ठिंबक पद्धतीने पाणी देत असल्याने पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात होते. सव्वा वर्षानंतर फळ येणे सुरू झाले. कुठल्याही रासायनिक व कीटकनाशकाचा वापर केला जात नाही. फक्त जैविक खताचा वापर करण्यात येतो. त्यामुळे ड्रगन फळाच्या मागणीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. फळ झाडालाच पिकू देत असल्याने त्याची चवही चांगली असल्याचे दिसून येते. जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतच फळ लागतात. प्रथमवर्षी लावलेले झाडे कटिंग करत ठेवल्याने ते दहा वर्षांपर्यंत फळे देतात, अशी माहिती युवा शेतकरी मनीष पचारे यांनी दिली.

फळाचे वजन ३५० ते ४०० ग्रॅम- ड्रॅगनच्या एका फळाचे वजन ३५० ते ४०० ग्रॅम आहे. ते झाडाला पिकल्यानंतर तोडली जातात. सध्या २५० रुपये प्रतिकिलो दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून वरोरा तालुक्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांनी पडीक व हलक्या प्रकारच्या जमिनीवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्यास कृषी विभागाकडून अनुदान दिले जाते.-विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, शेगाव.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती