शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

चंद्रपूर जिल्ह्यात ३६१ सामान्य, तर ४६ गर्भवती एचआयव्ही संक्रमित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 13:45 IST

Chandrapur : एप्रिल ते मे २०२४ मध्ये करण्यात आल्या १९ हजार १८३ सामान्य एचआयव्ही तपासण्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील वर्षी २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात १ लाख ९१५ एचआयव्ही चाचण्या झाल्या. त्यामध्ये २९७ सामान्य संक्रमित, तर ४६ हजार ९९६ गरोदर मातांमध्ये ३२ माता संक्रमित असल्याचे आढळून आले. एप्रिल ते मे २०२४ मध्ये १९ हजार १८३ सामान्य एचआयव्ही तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ६४, तर ८ हजार ६८७ गरोदर मातांमध्ये १४ महिला संक्रमित आढळल्याची माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या त्रैमासिक आढावा बैठकीत समोर आली.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची निहुलकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी दीपक बानाईत, महानगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, डॉ. पराग जीवतोडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, वैद्यकीय अधिकारी एआरटी डॉ. श्रीकांत जोशी, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, नसीमा शेख अनवर, देवेंद्र लांजे उपस्थित होते.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सादर करताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली. बैठकीला राज काचोळे, रोशन आकुलवार, गोपाल पोर्लावार, माधुरी डोंगरे, विहान प्रकल्पाच्या संगीता देवाळकर आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोफत बस पास योजनाजिल्ह्यातील अतिजोखीम गटात असणाऱ्या समुदायातील प्रत्येकाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्या दिशेने कार्य करण्याच्या सूचना विवेक जॉन्सन यांनी दिल्या. एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी शासनाची मोफत बस पास योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :HIV-AIDSएड्सchandrapur-acचंद्रपूरhospitalहॉस्पिटल