शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विनापरवानगी वर्गणी गोळा केल्यास तीन महिन्यांपर्यंत करावासासोबत दंडाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 13:03 IST

Chandrapur : गणेश मंडळांना धर्मादाय आयुक्तांकडे करावा लागणार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील गणेश मंडळांतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाकरिता वर्गणी गोळा केली जाते. मात्र वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे. असे न करता वर्गणी गोळा केल्यास तीन महिन्यांपर्यंत साधा कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. शिक्षा टाळण्यासाठी वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे आहे.

वर्गणीमध्ये रोख रक्कम किंवा वस्तूंच्या स्वरूपात कोणताही पैसा, वर्गणी किंवा देणगी गोळा करण्याकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१- क नुसार सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांच्याकडून ऑनलाइन परवानगी, प्रमाणपत्र देण्यात येते. जिल्ह्यातील सर्व लहान, मोठ्या मंडळांनी वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घ्यावी, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केले आहे. 

अर्जासोबत दाखल करावयाची कागदपत्रे अर्ज करावा, मंडळाच्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी असलेल्या ठरावाची प्रत, सर्व सदस्यांचे ओळखपत्र, जागेबाबत जमीन मालकाचे ना- हरकत प्रमाणपत्र, नगरसेवक, सरपंच किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांचे शिफारसपत्र, विद्युत बिलाची प्रत, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र, मागील वर्षीचे परवानगीची प्रत, मागील वर्षाच्या-जमा खर्चाचा हिशेब.

अशी होणार कारवाई कलम ४१ 'क'च्या तरतुदींचे उल्लंघन करून, सहायक धर्मादाय आयुक्त, चंद्रपूर यांची परवानगी न घेता पैसा, वर्गणी किंवा देणगी गोळा केल्यास आणि तसा दोष सिद्ध झाल्यास, तीन महिन्यांपर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलित रकमेच्या किंवा अंशदानाच्या दीडपटीपर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होईल. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर