गोसेखुर्द धरणाचा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 09:04 PM2020-08-31T21:04:41+5:302020-08-31T21:05:03+5:30

गोसेखुर्द धरणाचा ब्रम्हपुरी तालुक्यात जाणारा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला आहे. इ-३ ब्रांच असे या फुटलेल्या कॅनलचे नाव असून चौगान, कीन्ही, रणमोचन आणि खरकाडा या ४ गावाजवळ हा कॅनल पाण्याच्या प्रचंड दबावामुळे फुटला आहे.

An important small canal of Gosekhurd dam burst in 4 places | गोसेखुर्द धरणाचा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला

गोसेखुर्द धरणाचा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला

Next
ठळक मुद्देगावांना धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीची पूर परिस्थिती आणखी वाईट होत आहे. गोसेखुर्द धरणाचा ब्रम्हपुरी तालुक्यात जाणारा एक महत्वाचा लघु कालवा ४ जागी फुटला आहे. इ-३ ब्रांच असे या फुटलेल्या कॅनलचे नाव असून चौगान, कीन्ही, रणमोचन आणि खरकाडा या ४ गावाजवळ हा कॅनल पाण्याच्या प्रचंड दबावामुळे फुटला आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. यामुळे नवी गावे पुराच्या विळख्यात सापडत आहेत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी २५ बोटींची मागणी केली आहे. सध्या १२ बोटी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. शेकडो हेक्टर शेती, घरे पाण्याखाली आली आहेत.

प्रशासनाने पुराची पूर्वसूचना न दिल्याने भीषण स्थिती उद्भवल्याचा नागरिकांचा आरोप
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या सर्वाधिक पूरग्रस्त लाडज गावातून नागरिकांची सुटका करणे सुरू झाले आहे. एनडीआरएफच्या सात तुकड्यांना लाडज येथे तैनात करण्यात आले आहे. सुमारे तीन दिवसांनंतर महापुराच्या वेढ्यातून लाडजवासियांची सुटका सुरू झाली आहे. प्रशासनाने पुराची पूर्वसूचना न दिल्याने भीषण स्थिती उद्भवल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अजूनही लाडज गावातील शेकडो नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. बचाव यंत्रणांना लाडज गावापर्यंत पोचून नागरिकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून विसर्ग मात्र अद्यापही महत्तम आहे.

गोसेखुर्द धरणाच्या पुराचा फटका बसलेल्या गावांमध्ये खाद्य पाकिटे टाकणार- विजय वडेट्टीवार
हेलिकॉप्टरच्या सहाय्याने खाद्य पाकिटे-पाण्याच्या बाटल्या पुरवण्यात येणार आहेत. सुमारे १५ हुन अधिक बाधित गावांमध्ये पुराची स्थिती बिकट आहे. मांगली या गावाचा २४ तासापासून संपर्क तुटलेला आहे. गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ३०८०० वरून २६ हजार क्यूसेक्सपर्यंत विसर्ग खाली आणला. बाधित गावातील स्थिती निवळण्यास मात्र २४ तास लागणार, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

Web Title: An important small canal of Gosekhurd dam burst in 4 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर