शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पात होणार नियमांची काटेकोर अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 14:39 IST

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीने पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग केल्याच्या घटनेमुळे प्रकल्प व्यवस्थापन सतर्क झाले आहे.

ठळक मुद्देताडोबा वनसंरक्षक एन आर प्रवीण यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीने पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग केल्याच्या घटनेमुळे प्रकल्प व्यवस्थापन सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ताडोबाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिप्सी चालक व गाईडना तातडीची बैठक घेऊन देण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पाचे वनसंरक्षक एन आर प्रवीण यांनी लोकमतशी बोलताना दिली.वन्यजीवांचं आक्रमण यामुळे ताडोबातील पर्यटनावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली. ही बाब लक्षात घेऊन जिप्सींना कठडे बसवण्याच्या विचारही व्यवस्थापन करीत आहे.गेल्या दोन दिवसांत प्रकल्पाच्या कोअर आणि बफर झोनमधील दोन व्हिडीओ व्हायरल झाले. त्यातील एका व्हिडीओत जिप्सींनी एका वाघिणीला तिच्या पिल्लांसह घेरल्याचे दिसत होते. यामुळे ती रस्त्याच्या मधोमध अडकली होती. पर्यटकांकडून नियमांची वाट लावण्याचा प्रकार अंगलट येऊ शकतो, असे या व्हिडीओवरून दिसून येते. दुसऱ्या व्हिडीओत एक वाघीण एका जिप्सीचा पाठलाग करीत असल्याचे दिसले. ही वाघीण जिप्सीवर हल्लाही करू शकत होती. पण सुदैवाने असे घडले नाही. या दोन्ही घटना अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. यामुळे वन्यजीवांचे आणि पर्यटकांचे संरक्षण धोक्यात असल्याचे दिसून आले. वन्यजीवांना जवळून बघण्याच्या नादात पर्यटक जीव धोक्यात घालत आहेत. ही परिस्थिती बघता उघड्या जिप्सी बंद करून झाकलेल्या जिप्सी सुरू कराव्या, अशी मागणी आता पुढे येत आहे.या दोन घटना पुढे येताच व्यवस्थापन उघड्या जिप्सी बंद करण्याचा विचार करीत आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ताडोबाचे संचालक एन. आर. प्रवीण यांनी दिली. जिप्सी चालक आणि गाईडना तातडीने बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प