शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक; २५ जनावरांची सुटका, दोघांना अटक

By परिमल डोहणे | Updated: September 11, 2022 19:42 IST

ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

चंद्रपूर: ट्रकमध्ये कोंबून जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून सावली पोलिसांनी चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर नाकाबंदी करून २५ जनावरांची सुटका केली. रविवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सावली पोलिसांनी साडेबारा लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक केली आहे. यंदाची सावली पोलिसांची ही अकरावी कारवाई आहे. बक्षीस सिंग मुक्तार सिंग (४२) रा. खदूरसाहिब जि. करणतारण पंजाब), मोहम्मद आरिश मोहम्मद कुरेशी (२२, रा. बनत, ता. जि. शामली, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.

ट्रकमध्ये कोंबून जनावराची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी लगेच आपल्या पथकाच्या सहाय्याने चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर नाकाबंदी केली. यावेळी सीजी ०४ जेबी ७६४९ क्रमाकांचा संशयित ट्रकला थांबवून तपासणी केली. यावेळी वाहनात जनावरे कोंबून असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी त्या ट्रकसह साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर महा. पशुसंरक्षण अधिनियम, प्राणी छळ प्रति. अधि, महा. पोलीस अधि., मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, सावली ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन लाटकर, मोहन दासरवार, धीरज पिदूरकर यांनी केली.

टॅग्स :chandrapur-pcचंद्रपूर