शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ई सिगारेट व वेब फ्लेवरचा अवैध साठा जप्त, चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई 

By परिमल डोहणे | Updated: October 11, 2022 19:47 IST

चंद्रपूर येथे ई सिगारेट व वेब फ्लेवरचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. 

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील रामनगर परिसरातील दुर्गा मंदिराजवळील निशा प्रोव्हीजन व नागपूर रोडवरील टेक्स स्मोकींग या दुकानात धाड टाकून रामनगर पोलिसांनी विदेशी बनावटीचे 25 ई सिगारेट व वेब फ्लेवर असा एकूण ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त मंगळवारी जप्त करण्यात आला. याप्रकरणी दुकान चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इ सिगारेट जप्त केल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे. 

ई सिगारेट व वेब फ्लेवरवर राज्यात बंदी आहे. तरीही मोठ्या प्रमाणात ई सिगारेटची विक्री होत आहे. या सिगारेटमुळे कर्करोगाचा धोका अधिक असतो. महाविद्यालयीन व शाळकरी विद्यार्थी या ई सिगारेटच्या आहारी गेल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. रामनगर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रामनगर मधील दुर्गा मंदिरासमोरील निशा प्रोव्हिजन व नागपूर रोडवरील टेक्स स्मोकिंग या दोन दुकानात धाड टाकून झडती घेतली असता, अनुक्रमे ६ व १९ असे एकूण २५ ई सिगारेट आढळून आले. या सर्व ई सिगारेट जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, प्रशान्त शेंद्रे, किशोर वैरागडे, विनोद यादव निलेश मुळे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जुमनाके, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, विकास जाधव यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना सिगारेटचे व्यसनसध्या चंद्रपुर शहरामध्ये शिक्षण घेत असलेले लहान मुलांमध्ये मोठया प्रमाणात गांजा, ड्रग्स पावडर तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेटने नशा करण्याचे प्रमाण  वाढले आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे पेनीसारखी दिसते व ती मुलांच्या शाळेच्या बॅगमध्ये मुले शाळेत घेउन जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्या अनुषंगाने लहान मुलांकडे आई-वडीलांनी लक्ष्य ठेवावे, असे असे आवाहन पोलीसांकडुन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरCrime Newsगुन्हेगारी