त्यामुळे अवैध रेती तस्कर वाहनधारकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे .
नागभीड तालुक्यात मागील वर्षी ६५ टक्केच पाऊस झाल्यामुळे बोकोडोह नाला पूर्णपणे कोरडा झाला आहे .या बोकोडोह नाल्यावर तळोधी बा.सावरगाव ,वाढोणा,ओवाळा व अनेक गावातील विहिरीमधील बोअरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा नागरिकांना उपलब्ध करुन दिला जातो. मात्र जानेवारी महिन्यापासूनच नदी नाले कोरडे झाले असून जनावरांनासुध्दा पिण्याच्या पाण्यासाठी इकडेतिकडे भटकावे लागते आहे. मात्र या नदीनाल्यातून दिवसाढवळ्या जे.सी.बी.च्या साहाय्याने उत्खनन करुन ट्रँक्टरच्या माध्यमातून रात्रभर अवैध रेतीची तस्करी होत असताना महसूल विभागाच्यावतीने कारवाई केल्या जात नसल्याने व नदी नाल्यातील उपसा होऊन पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने जनावरांना तसेच नागरिकांनासुध्दा संकटातून जावे लागणार आहे. त्यामुळे संबंधित महसूल विभागाने ताबडतोब अवैध रेती तस्करावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना उप तालुकाप्रमुख मनोज वाढई यांनी केली आहे.